Jawan : शाहरुखच्या 'जवान' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने दिलं U/A प्रमाणपत्र; सुचवले 'हे' बदल
जवान (Jawan) या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं U/A प्रमाणपत्र दिले आहे.
![Jawan : शाहरुखच्या 'जवान' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने दिलं U/A प्रमाणपत्र; सुचवले 'हे' बदल Shah Rukh Khan Jawan passed with U/A certificate by CBFC Jawan : शाहरुखच्या 'जवान' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने दिलं U/A प्रमाणपत्र; सुचवले 'हे' बदल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/8850f8b5a2cd0e27ed18837a2891b3031692768654149802_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jawan : अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) जवान (Jawan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुख खानचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाला आता सेन्सॉर बोर्डानं U/A प्रमाणपत्र दिले आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटातील काही डायलॉग्स बदलण्याचे निर्देश दिले असून चित्रपटाच्या मेकर्सला या चित्रपटातील काही सिन्स हटवण्यास सांगितले आहेत.
सेन्सॉर बोर्डानं जवान चित्रपटामध्ये हे बदल सुचवले आहेत-
- चित्रपटामधील आत्महत्येसंबंधित दृश्य चित्रपटातून हटवण्यास सांगितले आहेत.
- चित्रपटात शिरच्छेद केलेल्या मृतदेहाचे दृश्य हटवण्यास सांगितले आहे.
- 'उंगली करना' डायलॉगच्या जागी 'उसे इस्तेमाल करो' हा डायलॉग वापरण्यात आला आहे. त्याचबरोबर पंथ हा शब्द घर, पैसा… .... की बुनियाद या शब्दांसोबत रिप्लेस करण्यात आला आहे.
- 'पैदा होके' या डायलॉगच्या जागी आता 'तब तक बेटा वोट डालने' या डायलॉगचा वापर करण्यात आला आहे.
- 'एक्सपर्ट ट्रेनर्स फ्रोम माय कंपनी... मेरा खर्चे पे.'आणि Because foreign language hai हे डायलॉग बदलण्यात आले आहेत.
- NSG शब्द बदलून IISG करण्यात आला आहे.
#Jawan Censor Certificate , Censor Cuts And Runtime details.
— Azam Sajjad (@AzamDON) August 22, 2023
7 modification done to last print pic.twitter.com/b4R7Y8uq09
जवान (Jawan) हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अॅटलीनं केलं आहे.
जवान चित्रपटाची स्टार कास्ट
शाहरुखसोबत (Shah Rukh Khan) जवान या चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपती, सुनील ग्रोवर प्रियमणी, सान्या मल्होत्रा,प्रियामणी, गिरिजा ओक, संजीता भट्टाचार्य हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. जवान चित्रपटातील जिंदा बंदा आणि चलेया ही दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या दोन्ही गाण्यांना नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.तसेच या चित्रपटाचा प्रीव्ह्यू देखील रिलीज करण्यात आला होता.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)