एक्स्प्लोर

Chhaava New Release Date : 'पुष्पा 2'मुळे 'छावा'ची रिलीज डेट पुढे ढकलली, निर्मात्यांसमोर नवीन तारीख शोधण्याचा मोठा पेच

Chhaava Release Date Postponed : छावा आणि पुष्पा 2 चित्रपटाची टक्कर टळली आहे. छावा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

Chhaava New Release Date : बॉक्स ऑफिसवर विकी कौशलच्या छावा आणि अल्लू अर्जूनच्या पुष्पा 2 चित्रपटाची टक्कर टळली आहे. पुढच्या महिन्यात सुपरस्टार अल्लू अर्जूनचा 'पुष्पा 2 : द रुल' आणि विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाची टक्कर होणार होती. हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी म्हणजेच 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार होते. पण, आता मोठी बातमी समोर आली आहे. विकी कौशलच्या छावा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. बॉक्स ऑफिसवर पुष्पा 2 चित्रपटासोबतची टक्कर रोखण्यासाठी छावा चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठी निर्णय घेतला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी छावा चित्रपटाची रिलीज डेट बदलण्याची शक्यता असल्याची बातमी समोर आली होती. आता या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे.

'पुष्पा 2'मुळे 'छावा'ची रिलीज डेट पुढे ढकलली

विकी कौशलच्या छावा चित्रपट आता 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार नागी. छावा चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. आता फक्त अल्लू अर्जूनचा पुष्पा 2 चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित होईल. छावा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलल्यानंतर आता निर्माते नवीन तारखेच्या शोधात आहेत. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी नवीन तारखेवर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. छावा चित्रपटाचा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्माता दिनेश विजान चित्रपटासाठी नवीन रिलीज डेट शोधत आहेत.

निर्मात्यांसमोर नवीन तारीख शोधण्याचा मोठा पेच

छावा चित्रपटासाठी निर्माता आणि दिग्दर्शक नवीन रिलीज डेटच्या शोधात आहेत. दरम्यान, आतापर्यंत याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या निर्मात्यांकडे रिलीज डेटसाठी दोन तारखा आहेत. या दोन पर्यायांपैकी एका तारखेवर निर्मात्यांचं एकमत होण्याची प्रतीक्षा आहे. पुढील 10 दिवसात छावा चित्रपटाची नवीन रिलीज डेट कंन्फर्म होऊ शकते. पुष्पा 2 चा क्लॅश टळला असला, तरी पुढील महिन्यात इतरही अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहेत.

पुढील महिन्यात बॉक्स ऑफिसवर धडकणार अनेक चित्रपट

विकी कौशल आणि रश्मिका मंदाना स्टार छावा चित्रपटाच्या नवीन रिलीज डेटचा आता मोठा पेच निर्माण झाला आहे. जर छावा चित्रपट 20 डिसेंबरला रिलीज झाला तर, या चित्रपटाची टक्कर 'मुफासा: द लायन किंग' चित्रपटासोबत होईल. त्यानंतर 25 डिसेंबरला वरुण धवनचा बेबी जॉन चित्रपट रिलीज होत असून त्यासोबत टक्कर होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही, तर 10 जानेवारीला रामचरण आणि कियारा अडवाणी यांचा गेमचेंजर चित्रपट रिलीज होत असून याचीही खूप चर्चा आहे. यामुळे आता नवीन रिलीज डेट शोधण्याचा नवा टास्क निर्मात्यांसमोर आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Shaktiman : शक्तिमान परतणार! पहिल्या भारतीय सुपरहिरोचं दमदार कमबॅक, मुकेश खन्ना यांनी शेअर केली पहिली झलक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget