Shah Rukh Khan: 'कोणती भूमिका साकारायला आवडेल?', 'आवडता सीन कोणता?' चाहत्यांचे प्रश्न; उत्तर देत शाहरुख म्हणाला...
आस्क एस आर के (#AskSRK) हा हॅश टॅगचा वापर करुन काही चाहत्यांनी शाहरुखला (Shah Rukh Khan) मजेशीर प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांना शाहरुखनं उत्तरं दिली आहे.
Shah Rukh Khan: बॉलिवूडमधील अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या पठाण या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. शाहरुख गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांनी ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. आता आस्क एसआरके (#AskSRK) हा हॅश टॅगचा वापर करुन काही चाहत्यांनी शाहरुखला मजेशीर प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांना शाहरुखनं उत्तरं दिली आहे.
शाहरुखला नेटकऱ्यांनी विचारले प्रश्न
'तू एवढ्या विविध भूमिकांमध्ये काम केलं आहेस. अशी कोणत्या प्रकारची भूमिका जी साकारायला तुला सर्वात जास्त आवडेल?' चाहत्याच्या या प्रश्नाला शाहरुखनं रिप्लाय दिला, 'आता मला लोकांना जे आवडते तेच करायला आवडेल. मी एक अभिनेता म्हणून विकसित झालो आहे. माझ्या वैयक्तिक आवडी कमी होत आहेत, असं मला वाटतं.' शाहरुखच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले.
Now I like to play what I think people would like me to play…I have evolved as an actor I think. My personal likes are diminishing. https://t.co/7cT5BqwAbO
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 20, 2023
एका नेटकऱ्यानं शाहरुखच्या सही असणाऱ्या टॅटूचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. 'माझा टॅटू कसा वाटला?' असा प्रश्न या नेटकऱ्यानं फोटो शेअर करुन विचारला. यावर शाहरुख म्हणाला, 'तुझा हात माझ्या चेकबुकसारखा दिसत आहे.'
Your arm looks like my cheque book!!! https://t.co/u0MmmO268h
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 20, 2023
'एखाद्या चित्रपटामधील तुझा आवडता सीन कोणता?' असाही प्रश्न एका नेटकऱ्यानं विचारला. या प्रश्नाला शाहरुखनं उत्तर दिलं, 'अमर अकबर अँथनी मधील मिस्टर बच्चन….‘मैंने दो मारा भाई पर सॉलिड मारा ना…’'
Mr Bachchan in Amar Akbar Anthony….‘Maine doh maara bhai par solid maara na…’ https://t.co/tsCfiDBV5s
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 20, 2023
शाहरुखचा पठाण चित्रपट हा आदित्य चोप्राच्या (Aditya Chopra) स्पाय युनिव्हर्समधील एक चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: