Pathaan OTT Release : अखेर ठरलं! बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा शाहरुखचा 'पठाण' ओटीटीवर होणार रिलीज; सिनेमात दिसणार मोठा बदल
Pathaan : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.

Shah Rukh Khan Pathaan OTT Release : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) या सिनेमाने सिनेमागृहात सात आठवडे पूर्ण केले असून या सिनेमाची क्रेझ अद्याप कायम आहे. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 22 मार्चपासून हा सिनेमा प्रेक्षक घरबसल्या पाहू शकता.
'पठाण' कुठे होणार रिलीज? (Pathaan OTT Release)
शाहरुख खानचा 'पठाण' (Pathaan) हा ब्लॉकबस्टर सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 22 मार्चला हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर (Prime Video) प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येईल.
View this post on Instagram
'पठाण' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सिद्धार्थ आनंदने सांभाळली आहे. तर यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. भारतासह परदेशातदेखील या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे. 'पठाण' सिनेमा सिनेमागृहात रिलीज होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने यातील काही सीन्स हटवले होते. आता हे सीन्स प्रेक्षकांना ओटीटी वर्जनमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आता हे नक्की कोणते सीन असतील याची सिनेप्रेमींना उत्सुकता आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला 'पठाण'
'पठाण' या सिनेमात शाहरुखसह दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची (Salman Khan) झलकदेखील या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
'पठाण'ची कमाई जाणून घ्या.. (Pathaan Box Office Collection)
शाहरुखचा 'पठाण' हा सिनेमा रिलीज होण्याआधीपासूनच रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. आतापर्यंत भारतात या सिनेमाने 522 कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे जगभरात या सिनेमाने 1055 कोटींचा गल्ला जमवला आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच या सिनेमाने सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले आहेत. प्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्यात या सिनेमाला यश आलं आहे. अनेकांनी पुन्हा-पुन्हा सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहिला आहे.
'पठाण 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'पठाण' या सिनेमाच्या यशानंतर सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच 'पठाण 2'ची घोषणा केली आहे. 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. सिनेमाची घोषणा झाल्यामुळे चाहते सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Pathaan: प्रतीक्षा संपली! शाहरुखचा 'पठाण' घरबसल्या पाहता येणार; कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? जाणून घ्या...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
