Happy Birthday Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या 59 व्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन, 250 इन्विटेशन आणि खास घोषणा
Shah Rukh Khan Birthday Celebration : अभिनेता शाहरुख खानचा 59 वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला जाणार आहे. शाहरुखचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला जाणार आहे.
Happy Birthday Shah Rukh Khan : बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खानचा आज वाढदिवस आहे. शाहरुख खानचा 59 वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला जाणार आहे. शाहरुखचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला जाणार आहे. किंग खान इंडस्ट्रीतील जवळचे मित्र आणि कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा करणार आहे. यासाठी खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं असून 250 लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुखची टीम आणि गौरी यांनी स्वतः शाहरुखच्या वाढदिवसाच्या गेस्ट लिस्ट तयार केली आहे. शाहरुखची पत्नी गौरी खानने या पार्टीसाठी सुमारे 250 आमंत्रणे पाठवली आहेत.
शाहरुख खानच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन
दरवर्षीप्रमाणे वाढदिवसाच्या दिवशी शाहरुख खान (Shah Rukh Khan) चाहत्यांना भेटेल. यासोबतच त्याच्या खास बर्थडे पार्टीमध्ये मोठे स्टार्स पार्टीला हजेरी लावतील. यावेळी शाहरुख खान त्याच् आघामीया 'किंग' चित्रपटाची घोषणा करू शकतो, असं सांगितलं जात आहे. या चित्रपटात शाहरुख खान त्याची मुलगी सुहाना खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. किंग खानच्या चाहत्यांना त्यांच्या लाडक्या अभिनेत्याच्या वाढदिवशी एक मोठं सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे.
बर्थडेसाठी किंग खानच्या पत्नीचं प्लॅनिंग
बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या वाढदिवसाची केवळ त्याचे कुटुंबीयच नाही तर त्याचे चाहतेही आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळेच प्रत्येक वाढदिवसाला शाहरुख खानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमते. यावेळी, दिवाळीनंतर लगेचच शाहरुखचा बर्थडे सेलिब्रेशन खूप खास असणार आहे. या खास प्रसंगाला आणखी खास बनवण्यासाठी किंग खानची पत्नी गौरीनं खूप प्लॅनिंग केलं आहे.
बर्थडे पार्टीसाठी 250 आमंत्रणे
शाहरुख खानच्या खास बर्थडे पार्टीसाठी गौरी खानने 250 आमंत्रणं पाठवल्याचं सांगितलं जात आहे. या पार्टीत रणवीर सिंह, सैफ अली खान, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, एटली, झोया अख्तर, फराह खान, शनाया कपूर, महीप कपूर, शालिनी पासी, नीलम कोठारी, करण जोहर, अनन्या पांडे, आलिया भट्ट आणि दिग्गज स्टार्सच्या नावाचा समावेश असल्याची माहिती आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :