Shah Rukh Khan : 'गर्लफ्रेंडसोबत 'Jawan' बघायचाय, फ्री तिकीट दे!', बेरोजगार बॉयफ्रेंडची शाहरुखकडे मागणी, किंग खान म्हणाला...
Shah Rukh Khan : शाहरुख खानने 'आस्क एसआरके' (Ask Srk) सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर अंदाजात उत्तरे दिली आहेत.
![Shah Rukh Khan : 'गर्लफ्रेंडसोबत 'Jawan' बघायचाय, फ्री तिकीट दे!', बेरोजगार बॉयफ्रेंडची शाहरुखकडे मागणी, किंग खान म्हणाला... Shah Rukh Khan Asrk Srk A Fan Asked SRK To Send Free Jawan movie Tickets For Girlfriend Actor Reply bollywood entertainment Shah Rukh Khan : 'गर्लफ्रेंडसोबत 'Jawan' बघायचाय, फ्री तिकीट दे!', बेरोजगार बॉयफ्रेंडची शाहरुखकडे मागणी, किंग खान म्हणाला...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/19466a8822c624a1007b7d157a8b57fe1693805181847254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या 'जवान' (Jawan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या रिलीजआधी अभिनेत्याने 'आस्क एसआरके' (Ask Srk) सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची हटके, मजेशीर अंदाजात उत्तरे दिली आहेत. किंग खानच्या एका बेरोजगार बॉयफ्रेंडने त्याच्याकडे 'जवान' सिनेमाचं फ्री तिकीट दे, अशी मागणी केली आहे.
शाहरुख खानच्या एका चाहत्याने ट्वीट केलं आहे की,"मी बेरोजगार बॉयफ्रेंड आहे.. मला माझ्या गर्लफ्रेंडसोबत 'जवान' सिनेमा पाहायचा आहे.. तर मला या सिनेमाचं तिकीट फ्रीमध्ये दे". या प्रश्नाचं उत्तर देत किंग खान म्हणाला,"मी फ्रीमध्ये फक्त प्रेम देतो...तिकीटासाठी तर पैसेच मोजावे लागतील..रोमान्सच्या बाबतीत एवढा चीपपणा का? लवकर जा..तिकीट काढ आणि तुझ्या जवळच्या व्यक्तीसोबत सिनेमा बघ".
किंग खानच्या एका चाहत्याने नयनतारासोबत (Nayantara) काम करतानाचा अनुभव कसा होता याबद्दल विचारलं आहे. यासंदर्भात बोलताना अभिनेता म्हणाला,"नयनतारा खूपच सुंदर, दर्जेदार आणि अभ्यासू अभिनेत्री आहे. तामिळनाडूतील तिच्या चाहत्यांना तिचं हे कामंही आवडेल, अशी आशा आहे, हिंदी प्रेक्षकांनाही तिच्या मेहनतीचा आदर आहे".
'जवान'च्या रिलीजआधी चाहत्याने शाहरुखला विचारलं आहे,"जवान' या सिनेमातील तुझं आवडतं गाणं कोणतं आहे?". याचं उत्तर देत किंग खान म्हणाला,"या सिनेमातील लोरी मला खूप आवडली आहे. पण 'चलेया' आणि 'नॉट रमैया वस्तावैया' ही माझी आवडती गाणी आहेत. तर एका चाहत्याने त्याला विचारलं आहे,"नर्वस आहेस?". यावर उत्तर देत किंग खान म्हणाला,"जवान' या सिनेमासाठी मी खूप उत्सुक आहे. हा सिनेमा जास्तीत जास्त प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा आहे. तीन वर्षांची मेहनत रेकॉर्डब्रेक कमाई करेल, असा अंदाज आहे".
'जवान' कधी रिलीज होणार? (Jawan Release Date)
'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात नयनतारा, दीपिका पादुकोन आणि विजय सेतुपती महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच आपली जादू दाखवली आहे. आता प्रेक्षकांना सिनेमाची प्रतीक्षा आहे.
संबंधित बातम्या
Shah Rukh Khan : 'भावा जेवलास का?', 'सिगरेट ओढतोस का?'; चाहत्यांच्या प्रश्नांना किंग खाननं दिली भन्नाट उत्तरं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)