एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : 'पठाण बघायला पाच वेळा गेलो, मला एक कोटी दे' चाहत्याची शाहरुखकडे थेट मागणी; किंग खानचा भन्नाट रिप्लाय, म्हणाला, 'भावा...'

Shah Rukh Khan : शाहरुख खानने 'आस्क एसआरके' या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर अंदाजात उत्तरे दिली आहेत.

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेला शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या 'पठाण' (Pathaan) सिनेमामुळे चर्चेत आहे. दरम्यान त्याने 'आस्क एसआरके' (Ask Srk) या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर अंदाजात उत्तरे दिली आहेत. 

'आस्क एसआरके'मध्ये शाहरुखच्या एका चाहत्याने त्याला विचारलं आहे, 'पठाण'च्या यशानंतर आता तुला कसं वाटतंय? यावर उत्तर देत किंग खान म्हणाला, "अजुनही विश्वास बसत नाही आहे... खूप कमाल वाटतंय". एका नेटकऱ्याने विचारलं आहे, "तुम्ही रेड चिलीज भोजनालय कधी सुरू करणार आहात? यावर उत्तर देत एसआरके म्हणाला, "मेन्यू कार्ड डिझाईन केलं आहे. पण सध्या अनेक सिनेमे पाईपलाईनमध्ये आहेत. त्यामुळे भोजनालय सुरू करण्यास वेळ लागेल." 

शाहरुखच्या एका चाहत्यानं 'पठाण'च्या यशाबद्दल त्याला विचारलं आहे, "पठाण' हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. 'पठाण' सिनेमाचं यश जवळून अनुभवताना कसं वाटतयं? यावर उत्तर देत किंग खान म्हणाला, "पठाण' हा सिनेमा मला खूप आवडला होता. पण हा सिनेमा प्रेक्षकांना इतका आवडेल याचा मला अंदाज नव्हता. आदि आणि सिड्सचा माझ्यावर असलेला विश्वास आणि दूरदृष्टीमुळे हे शक्य झालं आहे". 

किंग खानच्या एका चाहत्याने 'पठाण'च्या हुडीचा फोटो शेअर केला आहे. बेडवर हुडी ठेऊन हा फोटो काढण्यात आला आहे. फोटो शेअर करत चाहत्याने लिहिलं आहे,"नुकतीच ही नवीन हुडी घेतली". यावर शाहरुखने मजेशीर कमेंट करत लिहिलं आहे,"अरे वाह... जमिनीवर झोपला आहेस". 

'आस्क एसआरके'मध्ये एका नेटकऱ्याच्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने लिहिलं आहे, "पठाण' सिनेमा पाहायला पाच वेळा गेलो. 700 कोटींमधले एक कोटी मला देऊन टाका सर". यावर शाहरुखने कमेंट केली आहे, "भावा ऐवढा रेट ऑफ रिटर्न शेअर मार्केटमध्येही मिळत नाही. आणखी काही दिवस थांब... मग बघू... हा...हा". 

'पठाण' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुखचं हे तिसरं 'आस्क एसआरके' सेशन होतं. पण या सेशनचा चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Shah Rukh Khan : #Asksrk मध्ये शाहरुखला किती मॅरेज प्रपोजल येतात? किंग खान आधीच म्हणाला, "लग्नाचा प्रस्ताव सोडून दुसरं बोला"

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sangli : मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणाच्या वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणाच्या वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
Raigad ZP Election Result 2026: रायगड जिल्हा परिषदेत महायुतीचं वर्चस्व, कोणाला किती जागा मिळाल्या?
Raigad ZP Election Result 2026: रायगड जिल्हा परिषदेत महायुतीचं वर्चस्व, कोणाला किती जागा मिळाल्या?
Pravin Tidme: आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!
आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!

व्हिडीओ

Sharad Pawar Health Update : शरद पवार होतोय श्वसनाचा त्रास, रुबी रुग्णालयात केलं दाखल
Ram Satpute On ZP Election : मोहिते पाटील आणि जानकरांना घरात बसवलं- राम सातपुते
Avinash Jadhav : एक दिवस असा येईल की भाजपला एक जागा आणायलाही कसर करावी लागेल
Bharat Gogawale ZP Celebration : जिल्हा परिषदेत लेकाचा विजय, भरत गोगावलेंचं विजयी सेलिब्रेशन
Bharat Gogawale On Vikas Gogawale : भरतशेठला कुणीही हरवू शकत नाही, मुलाच्या विजयावर प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli : मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणाच्या वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणाच्या वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
Raigad ZP Election Result 2026: रायगड जिल्हा परिषदेत महायुतीचं वर्चस्व, कोणाला किती जागा मिळाल्या?
Raigad ZP Election Result 2026: रायगड जिल्हा परिषदेत महायुतीचं वर्चस्व, कोणाला किती जागा मिळाल्या?
Pravin Tidme: आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!
आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!
Ajit Pawar ZP Election Result: मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
Satara ZP Election : शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणेंच्या पत्नी अर्चना रांजणेंचा पराभव
शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, अर्चना रांजणेंचा पराभव, जावळीतून धक्कादायक निकाल
मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
Embed widget