Satish Shah: "यांना फर्स्ट क्लास कसा परवडेल?"; एअरपोर्टवरील कार्मचाऱ्यांनी हिणवलं, अभिनेत्याच्या उत्तरानं जिंकली मनं
सतीश शाह (Satish Shah) यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर केले आहे. त्यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.
Satish Shah: प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह (Satish Shah) हे त्यांच्या अभिनयानं नेहमी प्रेक्षकांच्या मनं जिंकतात. सतीश हे सध्या त्यांचा एका ट्वीटमुळे चर्चेत आहेत. युनायटेड किंगडमच्या (United Kingdom) हिथ्रो विमानतळावरील (Heathrow Airport) स्टाफनं अभिनेता सतीश शाह यांच्यावर एक कमेंट केली. "यांना फर्स्ट क्लास कसा परवडेल?" अशी कमेंट करत हिथ्रो विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी सतीश यांना हिणवलं.विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या या कमेंटला सतीश यांनी प्रतिक्रिया दिली. सतीश यांनी ट्वीटच्या माध्यमातून हिथ्रो विमानतळावर त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत सांगितलं. त्यांचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. तसेच अनेक नेटकरी त्यांच्या या ट्वीटचं कौतुक करत आहेत.
सतीश शाह यांची प्रतिक्रिया
सतीश शाह त्यांच्या ट्वीटच्या माध्यामातून सांगितलं की, 'हिथ्रो विमानतळावरील कर्मचार्यानं त्याच्यासोबत असणाऱ्या कर्मचाऱ्याला आश्चर्यचकितपणे विचारले, "यांना फर्स्ट क्लास कसा परवडेल?" मी अभिमानाने हसत उत्तर दिले. "कारण आम्ही भारतीय आहोत.' हिथ्रो विमातळाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटनं सतीश यांच्या या ट्वीटला रिप्लाय दिला आहे.
'सुप्रभात, आम्हाला याबद्दल ऐकून वाईट वाटले. तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता का?' असा रिप्लाय हिथ्रो विमातळाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन सतीश यांच्या ट्वीटला करण्यात आला.
सतीश यांच्या ट्वीटला आतापर्यंत 1,212 नेटकऱ्यांनी रिट्वीट केलं आहे. तर 12 हजारपेक्षा जास्त नेटरकऱ्यांनी सतीश यांच्या ट्वीटला लाइक केलं आहे. त्यांच्या ट्वीटला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'सर, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'जय हिंद'
I replied with a proud smile “because we are Indians” after I overheard the Heathrow staff wonderingly asking his mate”how can they afford 1st class?”
— satish shah🇮🇳 (@sats45) January 2, 2023
जाणून घ्या सतीश शाह यांच्याबद्दल...
अभिनेता सतीश शाह यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. साराभाई व्हर्सेस साराभाई या टीव्ही शोमुळे सतीश शाह यांनी विशेष लोकप्रियता मिळाली. सतीशने मैं हूं ना, हमशकल ओम शांती ओम आणि रा-वन यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कॉमेडी सर्कस या कार्यक्रमाचं सतीश शाह यांनी परीक्षण केलं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Prathamesh Parab: प्रथमेश परबची खास पोस्ट; म्हणाला, 'या दिवसानं माझं आयुष्य बदललं...'