(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Haddi : 'मेकअपसाठी तीन तास, तर लूक पाहिल्यावर मुलगी झाली नाराज'; नवाजुद्दीननं सांगितला 'हड्डी'मधील भूमिका साकारताना आलेला अनुभव
काही दिवसांपूर्वी हड्डी (Haddi) या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज झाले. या पोस्टरमधील नवाजुद्दीनच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.
Haddi : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. सध्या नवाजुद्दीन हा त्याच्या हड्डी (Haddi) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज झाले. या पोस्टरमधील नवाजुद्दीनच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. नवाजुद्दीन हा पोस्टरमध्ये महिलेच्या लूकमध्ये दिसला. नवाजुद्दीननं या भूमिकेबाद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितलं.
तीन तास करावा लागत होता मेकअप
एका मुलाखतीमध्ये नवाजुद्दीननं सांगितलं की, हड्डी चित्रपटातील भूमिकेसाठी तो तीन तास मेकअप करत होता. नवाजने पुढे सांगितले की, 'एखाद्या अभिनेत्रीला व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडण्यासाठी इतका वेळ का लागतो हे मला मेकअप करताना कळाले. ही व्यक्तिरेखा साकारताना जो अनुभव आला त्यामुळे माझ्या मनात अभिनेत्रीबद्दलचा आदर वाढला आहे. अभिनेत्रीला दररोज खूप त्रास होतो. केस,मेकअप, कपडे, नखे या सर्व गोष्टींकडे त्यांना लक्ष द्यावे लागते. पण मला मेकअप हेअर स्टाईल याची काळजी नव्हती कारण हे काम मेकअप आर्टिस्ट करणार होते मला फक्त महिला या कसं वागतात किंवा कसा विचार करतात? याकडे लक्ष द्यायचे होते. महिलेची भूमिका साकारताना मला महिलेसारखाच विचार करण्याची गरज होती. एक अभिनेता म्हणून हीच माझी परीक्षा होती. एखाद्या अभिनेत्याचे काम म्हणजे तो साकारत असलेल्या व्यक्तिरेखेची ओळख करून घेणे आणि त्यात हरवून जाणे. महिलांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे.
महिलेच्या लूकमध्ये पाहिल्यानंतर मुलीची रिअॅक्शन
जेव्हा नवाजुद्दीनच्या मुलीनं त्याला हड्डी चित्रपटातील भूमिकेच्या लूकमध्ये पाहिलं तेव्हा ती निराश झाली होती. पुढे नवाजुद्दीननं सांगितलं की, 'माझ्या मुलीनं पहिल्यांदाच मला तशा लूकमध्ये पाहिलं. ती निराश झाली होती पण नंतर आता ती नॉर्मल झाली आहे. तिला नंतर कळालं की मी तो लूक माझ्या भूमिकेसाठी केला होता.' 2023 मध्ये नवाजुद्दीनचा हड्डी हा चित्रपट रिलीज होणार आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Haddi : 'हड्डी' सिनेमातील नवाजुद्दीनच्या फर्स्ट लुकने वेधलं लक्ष; ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार अभिनेता
- Ganeshotsav 2022 : मालिका विश्वात बाप्पाचं थाटात होणार आगमन, पारंपरिक पद्धतीने साजरा करणार गणेशोत्सव!
- Entertainment News Live Updates 30 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!