Sapna Choudhary: सपना चौधरीवर गुन्हा दाखल; हुंड्यात क्रेटा गाडी मागितल्याचा आरोप
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप सपना चौधरीच्या (Sapna Choudhary) वहिनीने सपनावर केला आहे.
Sapna Choudhary : ठुमका क्विन सपना चौधरी (Sapna Choudhary) ही तिच्या नृत्यशैलीनं अनेकांची मनं जिंकते. अनेक वेळा सपना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सपना चौधरी (Sapna Choudhary) वर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप तिच्या वहिनीने केला आहे. सपनाच्या वहिनीनं तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, तिच्या आईवर आणि भावावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंड्यामध्ये क्रेटा गाडी मागितली आणि मारहाण केली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पलवल (Palwal) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सपना चौधरीसोबतच तिच्या आई आणि भावावरही गुन्हा दाखल
फरीदाबादच्या पलवल पोलीस स्टेशनमध्ये सपनाच्या वहिनीने सपनावर हुंड्यासाठी छळ, मारहाण यासह गंभीर आरोप करत गुन्हा नोंदवला आहे. सपनाच्या वहिनीनं सांगितलं की, तिच्याकडे हुंड्यात क्रेटा कारची मागणी करण्यात आली होती, मात्र हुंड्यात क्रेटा कार दिली नाही, तेव्हा तिचा छळ आणि मारहाण करण्यात आली. सपनाच्या वहिनीनं, सपना चौधरी, तिचा भाऊ कर्ण आणि तिच्या आईवर गंभीर आरोप केले आहेत. सपनाच्या वहिनीनं केलेल्या तक्रारीनंतर पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
सपना तिच्या डान्सिंग स्किल्सनं प्रेक्षकांची मनं जिंकते. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या गाण्यांना नेटकऱ्यांची पसंती मिळते. पण आता सपनावर गुन्हा दाखल झाल्यानं तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, असं म्हटलं जात आहे. या आधी देखील सपनावर गुन्हा दाखल झाला होता. तिच्यावर लखनौमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात तिच्याविरुद्ध अटक वॉरंटही काढण्यात आले होते. यानंतर तिला अटक करून, कोर्टात हजर करण्यात आले आणि या प्रकरणात आत्मसमर्पण केल्यानंतर तिला जमीन देण्यात आला होता.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :
PHOTO : ना कजरे की धार, ना मोतियों के हार... इंडो-वेस्टर्न साडीमध्ये सपना चौधरीचा झक्कास लूक