एक्स्प्लोर

Sankarshan Karhade : चालकाची तब्येत बिघडली, मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे बनला बस ड्रायव्हर, प्रशांत दामले म्हणाले...

Sankarshan Karhade : अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा नाटकाची बस चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sankarshan Karhade Video Shared Prashant Damle : अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने (Sankarshan Karhade) मालिका, नाटक आणि सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आता प्रशांत दामलेंनी (Prashant Damle) शेअर केलेल्या संकर्षणच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये तो नाटकाची बस चालवताना दिसत आहे. 

प्रशांत दामलेंनी शेअर केलेल्या व्हिडीमध्ये संकर्षण नाटकाची बस चालवताना दिसत आहे. दामलेंनी व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"काल रात्री कोथरुडच्या प्रयोगाला आमचा चालक प्रवीणला बरं वाटेनासं झालं. साधारणपणे प्रयोग 12.30 ला संपल्यावर आम्ही सेटवरुन जेवून रात्री दोनच्या सुमारास मुंबईकडे निघतो. पण चालक आजारी पडला म्हटल्यावर सगळचं थांबलं". 

दामलेंनी पुढे लिहिलं आहे,"पण थांबेल तो संक्या कसला? त्याने चालकाला मागे झोपवलं आणि स्वत: ड्रायव्हर सीटवर बसला आणि लोणावळ्यापर्यंत बस हाणली. त्याच्याकडे हेवीचा पण लायसन आहे हे कालच मला कळलं, लोणावळ्याला ड्रायव्हरची प्रकृती सुधारली आणि मग संक्या मागे जाऊन झोपला. झसको बोलता हैं जिगर...नाटकाचे प्रयोग आणि बस एकाच स्पीडने चालू आहेत". 

संकर्षणचा बस चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Sankarshan Karhade Video Viral Social Media)

संकर्षण कऱ्हाडेचा बस चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओवर शाब्बास पठ्ठ्या, ज्याच्याबद्दल वाटते सर्वांना आकर्षण.. असा आहे सर्वांचाच लाडका संकर्षण, माणसात देव असतो म्हणतात त्याची प्रचिती, दामले मास्तरांच्या तालमीत तयार झालेला हरहुन्नरी कलाकार, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

संकर्षण कऱ्हाडे एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबत कवी आणि लेखकदेखील आहे. सध्या तो तू म्हणशील तसं, नियम व अटी लागू या नाटकांत काम करत आहे. या दोन्ही नाटकांचे निर्माते प्रशांत दामले आहेत. 'नियम व अटी लागू' या नाटकाच्या प्रयोगादरम्यान संकर्षणने बस चालवली आहे. 

संकर्षण कऱ्हाडेबद्दल जाणून घ्या... (Who Is Sankarshan Karhade)

संकर्षण कऱ्हाडेने 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshingath), 'खुलता कळी खुलेना' (Khulta Kali Khulena) या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच 'वेडिंगचा शिनेमा' या सिनेमात तो महत्त्वाच्या भूमिकेत होता. 'महाराष्ट्राची किचन क्वीन' (Maharashtrachi Kitchen Queen)हा त्याचा कुंकिग शो आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

संबंधित बातम्या

Sankarshan Karhade: 'माझ्यावर चार गुंडांनी हल्ला केला...'; संकर्षण कऱ्हाडेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget