जेलमधून बाहेर आल्यानंतर संजयचा पहिलाच सिनेमा
मुंबई : दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या सिनेमातून अभिनेता संजय दत्त मोठ्या काळानंतर कमबॅक करणार आहे. लेखक अभिजात जोशी यांच्यासोबत 'मार्को' या सिनेमाची प्री प्रोडक्शनची तयारी चालू, आहे अशी माहिती विधू विनोद चोप्रा यांनी दिली.
'मामी' फिल्म फेस्टीव्हलमध्ये वधू विनोद चोप्रांनी संजू बाबाच्या कमबॅकची बातमी देऊन चाहत्यांना सरप्राईज दिलं. मार्च, एप्रिलपर्यंत या सिनेमाचं कथानक पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर एका आठवड्यातच शूटिंगला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती चोप्रा यांनी दिली.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजू बाबाचा हा पहिलाच सिनेमा आहे. त्यामुळे पुनरागमनाची चाहत्यांची उत्सुकता आता वाढणं स्वाभाविकच आहे. संजय दत्तने तुरुंगात असताना यापूर्वी आमीर खानच्या 'पीके' सिनेमात छोटीशी भूमिका साकारली होती. त्यामुळे चाहते त्याला मोठ्या काळानंतर पडद्यावर पाहणार आहेत.