Sambhajiraje Chatrapati: अभिनेता सुबोध भावेला संभाजीराजेंचे चॅलेंज,म्हणाले, 'माझे मुद्दे....'
संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी अभिनेता सुबोध भावेला (Subodh Bhave) देखील आव्हान दिलं आहे.
Sambhajiraje Chatrapati: हर हर महादेव (Har Har Mahadev) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात दाखवलेल्या सीन्सवर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी आक्षेप घेतला आहे. आता हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. त्याबद्दल संभाजीराजे छत्रपती यांनी (Sambhajiraje Chatrapati on har har mahadev) पत्रकार परिषदेत त्यांचे मत मांडले आहे. तसेच यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी अभिनेता सुबोध भावेला (Subodh Bhave) देखील आव्हान दिलं आहे.
काय म्हणाले संभाजीराजे?
संभाजीराजे आज बेळगाव दौऱ्यावर जाणार आहेत. दौऱ्यापूर्वी त्यांनी हर हर महादेव चित्रपट झी मराठीवर दाखवला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट केली. काही शिवभक्तांनी सुबोध भावे यांची भेट घेतली आणि चित्रपटाबद्दल मुद्दे मांडले. यावर प्रतिक्रिया देत संभाजीराजे म्हणाले, 'सुबोध भावेंनी पत्रकार परिषद घ्यावी आणि सांगावं की मी जे मुद्दे मांडले ते चुकले आहेत. सुबोध भावे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे. त्यांनी सांगावं की, त्यांनी जी भूमिका केलेली आहे, ती रास्त आहे त्यामध्ये काही चुकीचं नाहीये. ज्या दिवशी सुबोध भावे याबाबत बोलतील त्यावेळी मी त्यांचे ऐकेल. महाराष्ट्राच्या लोकांना त्यांनी हे सांगावं.'
ऐतिहासिक चित्रपटांचे पहिलं स्क्रिनिंग महाराष्ट्रात झालं पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. हर हर महादेव चित्रपटात स्त्रियांविषयी आक्षेपार्ह पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. इतिहास संशोधकांनी बोलावे. जर माझी भूमिका चुकीची असेल, तुम्ही सांगावे, मी पुन्हा कधीही अशा चित्रपटांवर पत्रकार परिषद कधीही घेणार नाही. असे संभाजीराजे म्हणाले.
हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड झाली आहे. केंद्रीय समितीवर आमचा विश्वास नाही. अशा चित्रपटांचे पहिल्यांदा महाराष्ट्रात स्क्रिनिंग झालं पाहिजे.
हर हर महादेव हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित देशपांडे यांनी केलं आहे. या चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर, ,अमृता खानविलकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: