Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' पाहिल्यानंतर समंथानं केलं आलियाचं कौतुक ; म्हणाली...
Gangubai Kathiawadi : समंथानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आलियाचं कौतुक केलं आहे.
Gangubai Kathiawadi : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटची (Alia Bhatt) प्रमुख भूमिका असणारा गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील आलियाच्या डॅशिंग अंदाजाचं अनेकांनी कौतुक केलं. नुकाताच अभिनेत्री समंथानं (Samantha) हा चित्रपट पाहिला. त्यानंतर तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आलियाचं कौतुक केलं आहे.
समंथानं इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये आलियाचा फोटो शेअर करून लिहीले, 'गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट मास्टरपीस आहे. आलियाचं कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. तिचा प्रत्येक डायलॉग आणि चेहऱ्यावरचे भाव हे माझ्या कायम लक्षात राहतील. ' समंथासोबतच सोफी चौधरी, अनन्या पांडे, आदित्य सील, अनुराग कश्यप आणि नीतू कपूर यांनी देखील आलियाचं कौतुक केलं आहे.
गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील आलियाचा अभिनयाचं विकी कौशलनं देखील कौतुक केलं आहे. विकीनं पोस्ट शेअर करून लिहिलं, 'मला समजत नाहिये की आलियबद्दल काय बोलू, संजय लीला भन्साळी तुम्ही मास्टर आहात. '
View this post on Instagram
गंगूबाई काठियावाडी या चित्रपटामध्ये आलियासोबत शांतनु महेश्वरी आणि अजय देवगण यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील ढोलिडा,झूमे रे गोरी, मेरी जान आणि जब सैय्या या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
हेही वाचा :
Anushka Sharma : अनुष्कानं केलं पेंटिंग ; नेटकरी म्हणाले, 'मजनू भाई'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha