![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Happy Birthday Samantha Ruth Prabhu : ऊ अंटावा गर्ल समंथाचे 'हे' चित्रपट नक्की पाहा; आयएमडीबीमध्ये मिळालेत सर्वाधिक रेटिंग
Samantha Ruth Prabhu : समंथाच्या 'द फॅमिली मॅन' या वेबसीरिजला आयएमडीबी रेटिंगमध्ये सर्वाधिक रेटिंग मिळाले आहे.
![Happy Birthday Samantha Ruth Prabhu : ऊ अंटावा गर्ल समंथाचे 'हे' चित्रपट नक्की पाहा; आयएमडीबीमध्ये मिळालेत सर्वाधिक रेटिंग Samantha Ruth Prabhu Birthday Special Samantha Ruth Prabhu Imdb rating movies know detials Happy Birthday Samantha Ruth Prabhu : ऊ अंटावा गर्ल समंथाचे 'हे' चित्रपट नक्की पाहा; आयएमडीबीमध्ये मिळालेत सर्वाधिक रेटिंग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/28/381a7863bbf4d502f8f223fa4ddab2721682662805019254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आज आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. समंथाने तामिळ, तेलुगू आणि हिंदी सिनेमांत काम केलं आहे. तिच्या सिनेमांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तिचा 'शाकुंतलम' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त आयएमडीबीने (IMDB) तिच्या 'टॉप 10' (Top 10) सिनेमांची यादी जाहीर केली आहे.
समंथाचे बहुचर्चित 'टॉप 10' सिनेमे जाणून घ्या...
1. द फॅमिली मॅन : समंथाच्या 'द फॅमिली मॅन' या वेबसीरिजचा आयएमडीबी रेटिंगमध्ये सर्वाधिक रेटिंग मिळाले आहे. या सीरिजला 8.7 रेटिंग मिळाले आहे. समंथाची ही सीरिज चाहत्यांच्या पसंतीस उतरली. या सीरिजच्या माध्यमातून समथांने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
2. महानाती : समंथाचा 'महानाती' हा सिनेमादेखील चांगलाच गाजला होता. या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 8.4 रेटिंग मिळाले आहे.
3. सुपर डीलक्स : समंथाचा 'सुपर डीलक्स' हा तामिळ सिनेमा 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात समंथा विजय सेतूपतीसोबत झळकली होती. या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 8.3 रेटिंग मिळाले आहे.
4. रंगस्थलम : 'रंगस्थलम' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी झाला होता. सर्वाधिक कमाई करणाऱ्या तेलुगू सिनेमांत या सिनेमाचा समावेश आहे. या सिनेमाने 216 कोटींची कमाई केली होती. या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 8.2 रेटिंग मिळाले होते.
5. कठ्ठी : समंथा रुथ प्रभूच्या 'कठ्ठी' या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 8.1 रेटिंग मिळाले आहे.
6. मनम : 'मनम' हा सिनेमा 2014 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या रोमॅंटिक सिनेमात नागा चैतन्य आणि समंथा मुख्य भूमिकेत होते. हा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आयएमडीबी रेटिंगमध्ये या सिनेमाला 7.9 रेटिंग मिळाले आहे.
7. 24 : '24' या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 7.8 रेटिंग मिळाले आहेत.
8. गूदाचारी : 'गूदाचारी' हा सिनेमा 2018 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा सिनेमालादेखील बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला. आयएमडीबी रेटिंगमध्ये या सिनेमाला 7.8 रेटिंग मिळाले आहे.
9. एगा : समंथाच्या 'एगा' या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 7.7 रेटिंग मिळाले आहेत.
10. ये मय्या चेसावे : समंथाच्या 'ये मय्या चेसावे' या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 7.7 रेटिंग मिळाले आहे.
समंथा रुथ प्रभू आज एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. 28 एप्रिल 1987 रोजी जन्मलेल्या समंथाने आजवर एकापेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे. आज समंथा 100 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.
संंबंधित बातम्या
Samantha Ruth Prabhu Report Card: ब्युटी विथ ब्रेन; समंथाचं दहावीचं रिपोर्ट कार्ड व्हायरल, गणितात 100 पैकी 100 तर इतिहासात...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)