Sam Bahadur New Poster Out: हातात काठी अन् भेदक नजर; सॅम बहादुर चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज, विकीच्या लूकनं वेधलं लक्ष
Sam Bahadur New Poster Out: सॅम बहादुर चित्रपटाच्या नव्या पोस्टरनं अनेक नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
![Sam Bahadur New Poster Out: हातात काठी अन् भेदक नजर; सॅम बहादुर चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज, विकीच्या लूकनं वेधलं लक्ष Sam Bahadur New Poster Out Vicky Kaushal Looks Intense Sits On a Jeep In New Sam Bahadur Poster Sam Bahadur New Poster Out: हातात काठी अन् भेदक नजर; सॅम बहादुर चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज, विकीच्या लूकनं वेधलं लक्ष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/01/0340db31fa7506caad4f55b3aef3c83a1698822205946259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sam Bahadur New Poster Out: अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) सॅम बहादुर (Sam Bahadur) या चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमधील विकीच्या लूकनं लक्ष वेधलं आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. या टीझरमधील विकीच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली. आता सॅम बहादुर चित्रपटाच्या नव्या पोस्टरनं अनेक नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
सॅम बहादुर चित्रपटाच्या पोस्टरमध्ये विकी हा एका जिपवर बसलेला दिसत आहे. त्याच्या हातात काठी आणि डोक्यावर टोपी दिसत आहे. विकीनं हा पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "SAM IS HERE!!!" तसेच विकीनं सॅम बहादुर चित्रपटाचं हे पोस्टर शेअर करुन या चित्रपटाच्या रिलीज डेटची देखील माहिती दिली आहे. 1 डिसेंबर 2023 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. विकीनं शेअर केलेल्या या पोस्टरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
सॅम बहादुर चित्रपटाची स्टार कास्ट
मेघना गुलजार यांनी देखील सॅम बहादुर चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. विकीच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक, रिचर्ड भक्ती क्लेन, साकिब अयुब आणि कृष्णकांत सिंह बुंदेला या कलाकारांनी देखील या चित्रपट महत्वाची भूमिका साकारली आहे. फातिमा सना शेखनं सॅम बहादुर या चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे तर सान्या मल्होत्रानं सॅम माणेकशॉ यांच्या पत्नी सिल्लू माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे.
काही दिवसांपूर्वी सॅम बहादुर या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला. "मुझे पॉलिटिक्स में कोई इंटरेस्ट नहीं है, आर्मी ही मेरी लाईफ है", हा विकीचा डायलॉग देखील सॅम बहादुर या चित्रपटाच्या टीझरमध्ये ऐकू येतो. "एक सोल्जर के लिए उसरी जान से ज्यादा कीमती होती है उसकी इज्जत.... और एक सोल्जर अपनी वर्दी की इज्जत के लिए अपनी जान भी दे सकता है." या टीझरमधील डायलॉगला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)