'या' अभिनेत्रीसाठी दिग्दर्शकावरच भडकला होता सलमान खान, "तुम्ही तिला हात कसा लावला"; हा किस्सा माहितीय?
Salman Khan Kissa : अभिनेता सलमान खान आगामी सिकंदर चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. ईदच्या मुहर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Salman Khan Bollywood Kissa : बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता सलमान खान नेहमीच त्याच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणेच त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत राहिला आहे. त्याचे सेटवरील आणि खऱ्या आयुष्यातील अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. सलमान एका अभिनेत्रीसाठी दिग्दर्शकावर भडकला होता. सलमान खानची पर्सनल लाईफ नेहमीच लाईमलाईटमध्ये पाहायला मिळाली. त्याच्या गर्लफ्रेंड्स आणि अफेअर्सची चर्चा आजही होते.
सलमान खानचा 'तो' किस्सा
सलमान खानच्या जुन्या रिलेशनशिप्सपैकी ऐश्वर्या रायसोबतच्या नात्याची चर्चा सर्वाधिक होती. या दोघांच्या नात्याचा शेवट फार कडू झाला. त्यांच्या रिलेशनशिपवेळीचे किस्से आजही प्रसिद्ध आहे. 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या शुटींगवेळी सलमान खान दिग्दर्शक संजय लीला भन्साळीवर खेकसला होता. सलमान संजय यांच्यावर ओरडला होता. या नेमका किस्सा काय आहे, ते जाणून घ्या.
जेव्हा दिग्दर्शकावर भडकला सलमान खान...
'हम दिल दे चुके सनम' ही बॉलिवूड कल्ट फिल्म संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केली आहे. 1999 मध्ये आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या सेटवर सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं प्रेम फुललं होतं. शुटींगदरम्यान त्याची लव्हस्टोरी सुरु झाली होती.
संजय लीला भन्साळी यांच्यावर भडकला होता सलमान
या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सलमान खान संजय लीला भन्साळी यांच्यावर भडकला होता. 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटात ऐश्वर्या रायच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्मिता जयकर यांनी त्यावेळीचा एक किस्सा सांगितला होता.
"तुम्ही तिला हात कसा लावला?"
चित्रपटातील 'आंखों की गुस्ताखियां माफ हों' या सुपरहिट गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान, संजय लीला भन्साळी ऐश्वर्याला डान्स स्टेप्स सांगत होते, त्यावेळी त्यांनी ऐश्वर्याचा हात पकडला यावेळी सलमानला खूप राग आला होता. संजयने ऐश्वर्याला स्पर्श करताच सलमानने भडकून म्हटलं की, तुम्ही तिला हात कसा लावला? तुम्ही तिला अजिबात हात लावू शकत नाही. यामुळे काही काळ सेटवरी तापमान वाढलं होतं, पण काही वेळाने सर्व परिस्थिती पूर्ववत झाली.
सलमान खूप प्रोटेक्टिव्ह आणि पोजेसिव्ह बॉयफ्रेंड होता, असं ऐश्वर्यानेही तिच्या अनेक जुन्या मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. दरम्यान, सलमान आणि संजय यांच्यातील वादही काळी काळाने निवळला. संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडी वेब सीरिजच्या प्रीमियरला सलमान खान दिसला होता. सलमान खान सध्या सिकंदर चित्रपटाचं शुटींग करण्यात व्यस्त आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :