Salman Khan : सलमान खानचा 'हा' चित्रपट 100 कोटींची कमाई करुनही फ्लॉप; काय आहे कारण?
Salman Khan : सलमान खानचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले आहेत. पण त्याचा एक चित्रपट मात्र 100 कोटींची कमाई करुनही फ्लॉप समजला जातो.
Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. 2000 च्या दरम्यान जन्मलेल्यांसाठी सलमान खान सुपरस्टार आहे. 2000 नंतर सलमानच्या करिअरची गाडी सुसाट सुटली. पण 90 च्या दशकात भाईजानला मोठा संघर्ष करावा लागला आहे. सलमान खानचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले आहेत. पण त्याचा एक चित्रपट मात्र 100 कोटींची कमाई करुनही फ्लॉप समजला जातो. सलमानच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते.
सलमान खानचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात फिल्मी घराण्यात झाला. पण तरीही त्याचं आयुष्य सोपं नव्हतं. त्याला मोठ्या प्रमाणात संघर्षाचा सामना करावा लागला आहे. सलमान खान हा सिनेसृष्टीतील लोकप्रिय पटकथालेखक, अभिनेते आणि निर्माते सलीम खान यांचा मुलगा आहे. सलीम खान यांचा मुलगा असल्याने त्याला बॉलिवूडमध्ये सहज पदार्पण करता आलं. पण खरा संघर्ष त्यानंतर होता. 'बीवी हो तो ऐसी' हा सलमान खानचा पहिला चित्रपट होता. पण त्याला पहिला हिट चित्रपट 'मैंने प्यार किया' ठरला. या चित्रपटाला सलमानला जास्त फायदा झाला नाही. तर भाग्यश्रीला या चित्रपटाच्या यशाचं क्रेडिट देण्यात आलं. त्यानंतर भाग्यश्रीने चित्रपटांमध्ये काम करणं बंद केलं आणि बॉलिवूडपासून दूर झाली. पहिल्या हिट चित्रपटानंतरही चांगला सिनेमा मिळवण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. 'IIFA 2022' पुरस्कार सोहळ्यात भाईजानने याबद्दल भाष्य केलं आहे.
सलमान खान त्यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देताना भावूक झाला होता. सिने-निर्माते रमेश तौरानी यांना त्याने देवासमान दर्जा दिला. सलमानकडे काम नसताना त्याच्या आयुष्यात रमेश तौरानी यांची एन्ट्री झाली. त्यांच्यामुळे त्याला 1991 मध्ये 'पत्थर के फूल' हा चित्रपट मिळाला. पुढे जीपी सिप्पी यांनी त्याला पुढील चित्रपट दिला. रमेश तौरानी यांनी सिप्पीच्या ऑफिसमध्ये जाऊन म्युझिकसाठी 5 लाख रुपये दिले. त्यानंतर त्याला हा चित्रपट मिळाला.
मित्रांनी कधी विसरायचं नाही : सलमान खान
पुरस्कार सोहळ्यात सलमान खानने बोनी कपूर यांचेही आभार मानले होते. सलमान खानचं करिअर चांगलं सुरू नसताना बोनी कपूर यांनी त्याला 'वॉन्टेड' या चित्रपटाची ऑफर दिली. त्यानंतर त्याच्या करिअरने वेग धरला. 'वॉन्टेड'आधी सलमान खानचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते. एकेकाळी सलमानकडे शर्ट आणि वॉलेट घ्यायला पैसे नव्हते. त्यावेळी सुनील शेट्टीने त्याला त्या वस्तू भेट दिल्या होत्या.
सलमान खानचा प्रेरणादायी प्रवास
सलमान खानचे अनेक चित्रपट फ्लॉप होऊनही त्याच्या चाहतावर्गात घट झालेली नाही. दिवसेंदिवस त्याच्या चाहतावर्गात वाढ होत आहे. सलमान खानचा 2003 मध्ये 'तेरे नाम' आणि 2009 मध्ये 'वॉन्टेड' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यादरम्यान त्याचे 18 चित्रपट प्रदर्शित झाले. यातील फक्त 5 चित्रपट हिट झाले. बाकी सर्व फ्लॉप झाले. त्यामुळे तो एकावेळी दोन चित्रपटांची ऑफर स्विकारू लागला. वॉन्टेड अभिनेता दबंग आणि टायगर म्हणून नेहमीच चर्चेत राहिला. वॉन्टेडनंतर त्याचे 23 चित्रपट प्रदर्शित झाले. यातील 14 चित्रपट हिट झाले. तर त्याच्या फ्लॉप झालेल्या चित्रपटांनीही 100 कोटींची कमाई केली.
बॉलिवूडचा सचिन सलमान खान!
सलमान खानच्या एखाद्या चित्रपटाने 100 कोटींच्या आसपास कमाई केली तरी तो फ्लॉप ठरवला जात असे. सचिन 80 रनवर आऊट झाला तर क्रिकेटप्रेमींना आवडत नसे. त्याप्रमाणे बॉलिवूडमध्येही सलमानच्या बाबतीतही होतं. सलमान खानच्या 'रेस 3' या चित्रपटाने 166 कोटी रुपयांची कमाई केली. पण तरीही हा चित्रपट फ्लॉप ठरवला गेला. सलमान खान हीरो नव्हे तर सुपरहीरो झाला. प्रत्येकावर त्याने आपला प्रभाव सोडला आहे.
भारतात सलमानने बॉडी बिल्डिंगची क्रेझ सुरू केली. एखाद्या बड्या पार्टीसह रस्त्यावर सलमानचे चांगलेच चाहते आहेत. सलमानची प्रत्येक स्टाइल चाहत्यांना आवडते. मेहनतीच्या जोरावर सलमान खानने स्वत:ला सिद्ध केलं आहे.
संबंधित बातम्या