एक्स्प्लोर
Advertisement
देशाला 'फिट' करण्यासाठी सलमानची नवी मोहीम, 2020 पर्यंत करणार 'हे' काम
फिटनेस इंडिया मोहीम राबविण्यासोबतच प्रत्येकाला फिट आणि स्वस्थ बनवायचे आहे, असे सलमानने म्हटले आहे. या सोबतच या मोहिमेमुळे फिटनेस ट्रेनर आणि अनेक लोकांना रोजगाराच्या संधी देखील निर्माण होणार आहेत.
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असतो. अभिनयाबरोबरच तो फिटनेसच्या बाबतीत नेहमी सजग असतो. वेळोवेळी तो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपल्या फिटनेसच्या बाबतीत अपडेट आपल्या चाहत्यांना देत असतो. आता फिटनेसच्या या मोहिमेला सलमान मोठे स्वरूप देण्याच्या तयारीत आहे.
सलमान आपली एसके-27 जिम फ्रँचाइजी लॉन्च करण्याच्या तयारीत असून 2020 पर्यंत देशभरात 300 जिम या अंतर्गत उभारणार असल्याची माहिती आहे.
सलमान खानच्या बीईंग ह्युमन या उपक्रमाच्या अंतर्गत विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सोबतच त्याची बीईंग स्ट्रॉन्ग फिटनेस इक्विपमेंट हा उपक्रम देखील सुरु आहे. यानंतर सलमान आता जिम आणि फिटनेस सेंटरची साखळी देशभरात सुरु करणार आहे. फिटनेस इंडिया मोहीम राबविण्यासोबतच प्रत्येकाला फिट आणि स्वस्थ बनवायचे आहे, असे सलमानने म्हटले आहे. या सोबतच या मोहिमेमुळे फिटनेस ट्रेनर आणि अनेक लोकांना रोजगाराच्या संधी देखील निर्माण होणार आहेत.
गेल्या एप्रिल महिन्यात सलमान ने आपला फिटनेस ब्रँड बीईंग स्ट्रॉन्ग लॉन्च केला होता. देशभरातील 175 हुन अधिक जिममध्ये हा ब्रँड पोहोचला असल्याची माहिती आहे.
सलमान खान फिटनेसच्या बाबतीत लाखो लोकांचा आयकॉन आहे. तो फिटनेसबाबत नेहमीच सजग असतो. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तो नेहमी जिम ट्रेनिंगचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतो. युवकांमध्ये सलमानच्या फिटनेसची क्रेझ आहे. अनेक युवक सलमानसारखा फिटनेस हवा यासाठी प्रयत्न करत असतात. नुकत्याच आलेल्या सलमानच्या ‘भारत’ ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. हा सिनेमा 200 कोटींच्या घरात गेल्याची माहिती आहे. सध्या सलमान आपल्या ‘दबंग 3’ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्याच्या दबंग आणि दबंग 2 ला प्रेक्षकांची जोरदार पसंती मिळाली होती.View this post on Instagram
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement