Salman Khan: भर कार्यक्रमात सलमाननं दाखवले सिक्स पॅक्स; म्हणाला, 'तुम्हाला वाटतं वीएफएक्स आहे...'
‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सलमाननं त्याचे सिक्स पॅक्स दाखवले.
Salman Khan Six- Pack Abs: अभिनेता सलमान खान (Salman Khan) बॉलिवूडमधील फिटनेस फ्रीक अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमान हा वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. तो लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काल (10 एप्रिल) रिलीज झाला. या ट्रेलरमधील सलमानच्या सिक्स पॅक्सनं अनेकांचे लक्ष वेधले. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सलमाननं त्याचे सिक्स पॅक्स दाखवले.
सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी (10 एप्रिल) मुंबईतील एका कार्यक्रमात लाँच करण्यात आला.या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमादरम्यान सलमानने त्याच्या सिक्स पॅकबद्दल सांगितलं. यावेळी सलमाननं ट्रेलर लाँचला उपस्थित असलेल्यांना सिक्स पॅक्स दाखवले. ट्रेलर लाँचमधील सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.ज्यामध्ये तो सिक्स पॅक्सबद्दल बोलताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये सलमान हा ब्लॅक शर्ट, ग्रे पँट अशा कूल लूकमध्ये दिसत आहे. सलमाननं ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमामध्ये शर्टचे बटण ओपन करुन त्याचे सिक्स पॅक्स दाखवले. त्यानंतर सलमान म्हणाला, तुम्हाला वाटतं वीएफएक्समुळे होते. आधी चार होते आता सहा झाले आहेत.' ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये देखील सलमानचे सिक्स पॅक्स दिसत आहे.
पाहा व्हिडीओ:
Latest: #SalmanKhan goes shirtless 🔥🔥#KisiKaBhaiKisiKiJaanTrailer pic.twitter.com/NWbUI9nqnj
— Legend BALLU⚡ (@LegendSKFan) April 10, 2023
'किसी का भाई किसी की जान' मधील कलाकार
'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडेसोबतच शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 21 एप्रिल 2023 रोजी सलमान खानचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :