एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अरिजीतसोबतच्या वादावर सलमानने मौन सोडलं!
मुंबई : सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंहसोबतच्या वादावर सलमान पडदा टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. एका कार्यक्रमादरम्यान जेव्हा सलमानला अरजितीसोबतच्या वादावर विचारणा झाली, त्यावेळी उत्तरात सलमान म्हणाला, ‘वह क्या है?’
अरिजीतवरील प्रश्नावर बोलताना सलमान म्हणाला, “एखाद्या सिनेमात अनेक गायक गाणं गातात. सिनेमाचा दिग्दर्शक आणि निर्माता ठरवतात, कुणाचा आवाज संबंधित गाण्यासाठी योग्य आहे. माझाही आवाज होता, मात्र तोही फेटाळला गेला. म्हणून मी नाराज किंवा दु:खी झालो नाही. हेच तर आयुष्य आहे.”
सलमान-अरिजीत यांच्यातील वाद काय आहे?
अरिजीतने ‘सुलतान’ सिनेमातील त्याचं गाणं कायम ठेवण्यासाठी सलमानला विनंती केली होती. मात्र, अरिजीतचं गाणं हटवून, तेच गाणं राहत फतेह अली खान यांच्या आवाजात रेकॉर्ड केलं गेलं. सलमाननेही या गाण्यासाठी आवाज दिला होता. त्यानंतर अरिजीतने फेसबुकवरुन सलमानची माफीही मागितली होती.
संबंधित बातम्या: सलमान, माफ कर, 2 वर्षांपूर्वीच्या वादासाठी अरिजीतची माफी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
राजकारण
क्रिकेट
Advertisement