(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम? म्हणाल्या..
Praniti Shinde: विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर चिंतन बैठकीत त्या बोलत होत्या. ही लोकशाही पद्धतीने झालेली निवडणूक नव्हती तर काही गोष्टीत भाजपने षडयंत्र केल्याचा दावाही प्रणिती शिंदे यांनी केला.
Maharashtra Assembly Election 2024: निवडणुका जिंकल्यानंतर चेहऱ्यावर आनंद असतो पण महाराष्ट्र जिंकल्यानंतर देखील मोदींच्या चेहऱ्यावर आनंद नाही. evm मॅन्यूपुलेट करून निवडणुका जिंकल्याने भाजपच्या कोणत्याच नेत्याच्या चेहऱ्यावर आनंद नाही . असं सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर चिंतन बैठकीत त्या बोलत होत्या. ही लोकशाही पद्धतीने झालेली निवडणूक नव्हती तर काही गोष्टीत भाजपने षडयंत्र केल्याचा दावाही प्रणिती शिंदे यांनी केला.
काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?
ही निवडणूक सरळ नव्हतीच, काही गोष्टीमध्ये त्यांनी षडयंत्र केलं. हे लोकशाही पद्धतीने झालेली निवडणूक नाही, ही तत्वाची लढाई नव्हती. तरी तुम्ही लढलात, तुम्ही टिकलात त्या बद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.
cwc च्या मिटिंग मध्ये राहुल गांधी म्हणाले, आपण जेव्हा निवडणूक जिंकतो तेव्हा चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरल्यावर दुःख असतं.Bपण आपण ही निवडणूक हरलेलो नाही, आपला विजयच झालेला आहे.
तुम्ही मोदींचा चेहरा बघा, महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये. कारण ते मागच्या रस्त्याने येउन, evm मॅन्यूपुलेट करून 133 जवळपास पोहोचलेत. त्यामुळेच भाजपच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाही तुम्ही निरीक्षण करून बघा. असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. सोलापूर जिल्ह्यातील माढा, बार्शी, माळशिरस, पंढरपूर, सांगोला,मोहोळ, अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर दक्षिण, सोलापूर मध्य आणि सोलापूर उत्तर या 11 मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातच प्रमुख लढत झाली.
सोलापूरात महाविकास आघाडीला यश
राज्यात केवळ 51 जागांवर आघाडी असलेल्या महाविकास आघाडीला एकट्या सोलापूर जिल्ह्यातून 6 जागांवर विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली असून काँग्रेसने महाविकास आघाडीच्या (MVA) माध्यमातून जिल्ह्यात तीन जागा लढवल्या होत्या, मात्र येथील मतदारसंघातील एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघात शहाजी बापू पाटील, करमाळ्यातून संजय मामा शिंदे, माळशिरसमधून राम सातपुते, मोहोळमधून यशवंत माने आणि बार्शीतून आमदार राजेंद्र राऊत यांचा पराभव झाला आहे. तर, देवेंद्र कोठे, सोलापूर मध्य, राजु खरे मोहोळ, बाबासाहेब देशमुख, सांगोला, उत्तम जानकर, माळशिरस, आणि माढ्यातून अभिजीत पाटील हे 6 जण पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे, सोलापूर जिल्ह्यात वेगळीच लाट पाहायला मिळत आहे. कारण, राज्यात महायुतीची लाट असताना, सोलापुरात महाविकास आघाडीचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत.
हेही वाचा:
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल