एक्स्प्लोर

Salman Khan Birthday : सलमान खान वाढदिवसानिमित्त चाहत्यांना देणार मनोरंजनाची दावत; पाच सिनेमांची करणार घोषणा?

Salman Khan : बॉलिवूडचा भाईजानचा सलमान खान आज आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज वाढदिवसानिमित्त तो चाहत्यांना खास भेट देणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Salman Khan Birthday Special : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आज आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून भाईजानवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आज वाढदिवसानिमित्त भाईजान चाहत्यांना खास भेट देणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सलमान खानच्या वाढदिवसाची चाहते प्रतीक्षा करत असतात. सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर अनेक चाहते दरवर्षी न चुकता भाईजानला शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. मोठे-मोठे पोस्टर्स घेऊन ते गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर उभे असतात.

सलमान खान आपल्या चाहत्यांना कधीच निराश करत नाही. बाल्कनीत येत तो चाहत्यांना भेटतो. सलमानने अनेकदा आपल्या वाढदिवशी आगामी सिनेमाची घोषणा करत चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे यंदाची भाईजानची ही भेट चाहत्यांना मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

2024 गाजवणार सलमान खान!

सलमान खानचे 2023 मध्ये प्रदर्शित झालेले सिनेमे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडले आहेत. पण 2024 हे वर्ष भाईजानसाठी नक्कीच खास असणार आहे. बॉलिवूड लाइफच्या वृत्तानुसार, 2024 मध्ये सलमानचे एक-दोन नव्हे तर पाच बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. भाईजान आज आपल्या वाढदिवसानिमित्त या सिनेमांची घोषणा करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

'या' सिनेमांची घोषणा करणार सलमान खान?

करण जोहर आणि सूरज बडजात्या यांच्या आगामी सिनेमात सलमान खान काम करणार आहे. तसेच यशराज फिल्म्सच्या 'टायगर वर्सेस पठाण' या सिनेमातही करण जोहर दिसणार आहे. शाहरुख खान आणि सलमान एका सिनेमात काम करणार आहेत. 25 वर्षांनंतर सलमान खान आणि करण जोहर एकत्र काम करणार आहेत. 'दबंग 4' आणि 'किक 2' या सिनेमांची सलमान खान घोषणा करू शकतो, असे म्हटले जात आहे. 

सलमान खानचं पूर्ण नाव अब्दुल रशीद सलीम सलमान खान असं आहे. कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सलमानची पहिली कमाई फक्त 75 रुपये होती. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली आहे. 'बीवी हो तो ऐसी' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. पण 'मैंने प्यार किया' या सिनेमाने खऱ्या अर्थाने त्यांना लोकप्रियता मिळाली. सलमानच्या सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. 2024 मध्ये सलमान खान बॉक्स ऑफिस गाजवणार असे म्हटले जात आहे.

संबंधित बातम्या

Happy Birthday Salman Khan : सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Trisha Krishnan First Post After Thalapathy Vijay CM: थलपती विजय मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तृषा कृष्णन हिची पहिली पोस्ट; म्हणाली, 'प्रेम नेहमीच...'
थलपती विजय मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तृषा कृष्णन हिची पहिली पोस्ट; म्हणाली, 'प्रेम नेहमीच...'
Tamil Nadu CM Thalapathy Vijay: 'गरीबी वगैरे काही नाही, त्याचे वडील फिल्ममेकर...'; तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय पहिल्याच भाषणात खोटं बोलले? वर्गमित्राच्या दाव्यानं खळबळ
'गरीबी वगैरे काही नाही...'; तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय पहिल्याच भाषणात खोटं बोलले? वर्गमित्राच्या दाव्यानं खळबळ
Mouni Roy Divorce Rumors: मौनी रॉयचा हसता-खेळता संसार मोडला? 'त्या' कृतीमुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण, एकमेकांसोबतचे फोटोही डिलीट?
मौनी रॉयचा हसता-खेळता संसार मोडला? 'त्या' कृतीमुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण, एकमेकांसोबतचे फोटोही डिलीट?
Singer Accused on Trisha Krishnan: थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'

व्हिडीओ

Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे
Shivsena BJP Marathi Credit War Special Report : अमराठी नेते मैदानात, मराठीवरून दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
Thane Politics: अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
Singer Accused on Trisha Krishnan: थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
Devendra Fadnavis मोठी बातमी: मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
मोठी बातमी! केंद्राकडून 2026 मध्ये घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या घटनेनंतर शासनाचा निर्णय
मोठी बातमी! केंद्राकडून 2026 मध्ये घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या घटनेनंतर शासनाचा निर्णय
Rahul Dravid News : क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
Tamil Nadu CM Thalapathy Vijay: 'गरीबी वगैरे काही नाही, त्याचे वडील फिल्ममेकर...'; तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय पहिल्याच भाषणात खोटं बोलले? वर्गमित्राच्या दाव्यानं खळबळ
'गरीबी वगैरे काही नाही...'; तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय पहिल्याच भाषणात खोटं बोलले? वर्गमित्राच्या दाव्यानं खळबळ
Embed widget