एक्स्प्लोर
Advertisement
सलमान खान अवैध शस्त्र खटल्यातूनही सुटला!
जोधपूर : अभिनेता सलमान खानला जोधपूर कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणाच्या खटल्यातून सलमान खान सुटला आहे. 18 वर्षांनी हा निकाल आला आहे.
काळवीट शिकार केसमध्ये अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी सलमानविरोधात जोधपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली.
या सुनावणीसाठी सलमान खान कालच जोधपूरमध्ये दाखल झाला होता. मात्र आजच्या सुनावणीवेळी न्यायाधीश कोर्टात पोहोचले, तरी सलमान पोहोचला नव्हता. त्यामुळे कोर्टाने सलमानला अर्ध्या तासांचा वेळ दिला होता. त्यादरम्यान सलमान कोर्टात पोहोचला आणि काही क्षणांत निकाल आला.
या खटल्यात सलमानला संशयाचा फायदा मिळाला. त्यामुळे सलमान निर्दोष सुटला.
जर सलमानवर आरोप सिद्ध झाले असते, तर त्याला 7 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ झाली असती. 18 वर्ष जुन्या केससाठी सलमान जोधपुरात दाखल झाला आहे.
1998 साली ‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याचा आरोप सलमानवर करण्यात आला. 9 जानेवारीला कोर्टासमोर हे प्रकरण सादर करण्यात आलं होतं. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने पुढील सुनावणीसाठी सलमानला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते.
काय आहे प्रकरण?
परवाना संपलेली शस्त्रं सलमानने बाळगल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याच्याकडे असलेल्या दोन्ही शस्त्रांचा परवाना 22 सप्टेंबर 1998 रोजी संपला होता. मात्र त्याने या शस्त्रांनी 1 आणि 2 ऑक्टोबर 1998 रोजी काळवीटांची शिकार केली, असा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.
सलमानची ही शस्त्रं चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तपासादरम्यान त्याच्या हॉटेलच्या रुममध्येच ती आढळल्याचं याचिकाकर्त्याने म्हटलं होतं. शिवाय काळवीटांचा मृत्यू गोळी लागूनच झाल्याचा शवविच्छेदन अहवालही याचिकाकर्त्याने कोर्टासमोर सादर केला आहे.
सलमान विरोधात चार केस दाखल करण्यात आले होते. अवैध शस्त्रास्त्रं बाळगल्याप्रकरणी सलमानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संबंधित बातम्या
सात वर्षांची शिक्षा झाल्यास सलमान जोधपूर कोर्टातून थेट तुरुंगात
सलमानचं अवैध शस्त्रास्त्र प्रकरण, कोर्टात अंतिम सुनावणी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement