Salaar Box Office Collection : प्रभासच्या 'सालार'ने बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; रिलीजच्या 10 दिवसांत केली 500 कोटींपेक्षा अधिक कमाई
Salaar Movie : सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) 'सालार' या सिनेमाला सिनेमागृहात 10 दिवस पूर्ण झाले आहेत.
Salaar Box Office Collection Day 10 : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) यांचा 'सालार' (Salaar) हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमागृहात प्रदर्शित होऊन या सिनेमाला 10 वर्षे पूर्ण झाले आहेत. रिलीजच्या 10 दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडला आहे.
प्रभासच्या 'सालार : पार्ट 1 - सीझफायर' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. रिलीज झाल्यापासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. 'सालार' या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. रिलीज झाल्या झाल्या या सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.
'सालार'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Salaar Box Office COllection Day 10)
'सालार' हा सिनेमा 22 डिसेंबर 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पाच भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) या सिनेमाचा रेकॉर्ड प्रभासच्या सालारने ब्रेक केला आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 344.67 कोटींची कमाई केली आहे.
सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, प्रभासच्या 'सालार' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 90.7 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 56.35 कोटी, तिसऱ्या दिवशी 62.05 कोटी, चौथ्या दिवशी 46.3 कोटी, पाचव्या दिवशी 24.9 कोटी, सहाव्या दिवशी 15.6 कोटी, सातव्या दिवशी 12.1 कोटी, आठव्या दिवशी 9.62 कोटी, नवव्या दिवशी 12.55 कोटी आणि दहाव्या दिवशी 14.50 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या 10 दिवसांत या सिनेमाने 344.67 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 504.6 कोटींचा गल्ला जमवला आहे.
पहिला दिवस : 90.7 कोटी
दुसरा दिवस : 56.35 कोटी
तिसरा दिवस : 62.05 कोटी
चौथा दिवस : 46.3 कोटी
पाचवा दिवस : 24.9 कोटी
सहावा दिवस : 15.6 कोटी
सातवा दिवस : 12.1 कोटी
आठवा दिवस : 9.62 कोटी
नववा दिवस : 12.55 कोटी
दहावा दिवस : 14.50 कोटी
एकूण कमाई : 344.67 कोटी
तगडी स्टारकास्ट असलेला प्रभासचा 'सालार'
'सालार' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. प्रशांत नीलने (Prashant Neel) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारनसह या सिनेमात श्रुती हासन, जगपती बाबू, माइम गोपी, श्रिया रेड्डीसह अनेक कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'सालार' या सिनेमाला जगभरातील प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस या सिनेमाची क्रेझ वाढत चालली असून बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलच कलेक्शन जमवत आहे.
संबंधित बातम्या