Sajini Shinde Ka Viral Video: 'सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ'चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; राधिका भाग्यश्री, सुबोध भावे प्रमुख भूमिकेत
सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ (Sajini Shinde Ka Viral Video) या चित्रपटामध्ये राधिका मदन (Radhika Madan), भाग्यश्री, सुबोध भावे (Subodh Bhave), चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandekar) या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
Sajini Shinde Ka Viral Video: सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ (Sajini Shinde Ka Viral Video) या आगामी चित्रपटाचा सस्पेन्सने भरलेला ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. सजिनी शिंदे ही खरंच बेपत्ता झाली आहे का? तिनं आत्महत्या केली का? ती नक्की कुठे गेली आहे? हे सर्व प्रश्न चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर पडत आहेत.
"सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ" चित्रपटाची स्टार कास्ट
"सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ" या चित्रपटात राधिका मदन (Radhika Madan), निम्रत कौर, भाग्यश्री, सुबोध भावे (Subodh Bhave), चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandekar), शशांक शिंदे आणि सुमीत व्यास यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. "सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ" या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, एक अनुभवी आणि अत्यंत कुशल गुन्हे शाखेची अन्वेषक, बेला (निम्रत कौर) हरवलेल्या सजिनीला शोधण्याची केस हाती घेते.बेला ही केस सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत असते.
सुबोध भावेनं "सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ" या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "एक परफेक्ट बेटी, एक परफेक्ट मंगेतर, एक परफेक्ट टीचर और एक वायरल व्हिडीओ"
View this post on Instagram
मिखिल मुसळे यांनी "सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ" या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. ते या चित्रपटाबद्दल म्हणतात, “ या चित्रपटाची कथा एका सामाजिक थरारपटाच्या सेटअपमध्ये तयार करण्यात आली आहे आणि त्यात हिंदी आणि मराठी कलाकारांच्या प्रतिभावान समूहाचे उत्तम मिश्रण आहे. त्यांची उल्लेखनीय कामगिरी चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. आम्हाला आशा आहे की चित्रपटाला खूप प्रेम मिळेल कारण कलाकारांनी या चित्रपटात सर्वोत्कृष्ट काम केले आहे."
मिखिल मुसळे आणि परिंदा जोशी यांनी चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिली असून अतिरिक्त पटकथा आणि संवाद अनु सिंग चौधरी आणि क्षितिज यांनी लिहिले आहेत. 'सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ' हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तुमच्या वैचारिक शक्तीला आव्हान देणारा आणि शेवटपर्यंत तुम्हाला खिळवून ठेवणारा एक रोमांचक प्रवास 'सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ' या चित्रपटाच्या माध्यमातून पाहण्यास सज्ज व्हा!
संबंधित बातम्या: