एक्स्प्लोर
चाहत्यांच्या गराड्यात 'सैराट' सल्याची बारावीची परीक्षा!
सोलापूर: सध्या परीक्षांचा काळ असल्याने, सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे सेलिब्रिटी विद्यार्थीही व्यस्त आहेत.
सैराट सिनेमाच्या यशामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला सल्या अर्थात अरबाज शेखही चाहत्यांच्या गराड्यात बारावीची परीक्षा देत आहे.
जेऊर येथील परीक्षा केंद्रावर सल्या बारावीचे पेपर सोडवत आहे. सल्याने गेल्या दोन महिन्यांपासून जोरदार अभ्यास करुन परीक्षेची तयारी केली.
बारावीची परीक्षा संपेपर्यंत कोणतेही नवीन काम त्याने हाती घेतलेले नाही.
परीक्षा केंद्रावर अनेक चाहते त्यास शुभेच्छा देण्यासाठी येतात. याशिवाय सल्याला पाहण्यासाठी परीक्षा केंद्रावर मोठी गर्दी होत आहे. मात्र या चाहत्यांपासून दूर राहणे सल्याने पसंत केले आहे.
ही परीक्षा संपल्यावरच पुढच्या कामाबाबत विचार करेन, असं सल्याने 'एबीपी माझा'ला सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement