एक्स्प्लोर
...म्हणून सैफच्या मुलीचा करण जोहरच्या सिनेमाला नकार!
मुंबई : अमृता सिंह आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा सिनेदिग्दर्शक करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा होती. मात्र, सिनेमाची शूटिंग सुरु होण्याआधीच या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. कारण साराने करण जोहरच्या सिनेमाला राम राम केल्याचं बोललं जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, साराच्या फिल्म काँट्रॅक्टमध्ये एक अट होती की, टॅलेन्ट मॅनेजमेंट एजन्सीमध्ये अॅडमिट व्हावं लागेल, जी प्रोफेशनल मॅटर्स हँडल करते. मात्र, अमृता सिंहला काँन्ट्रॅक्टमधील अट मान्य नव्हती. त्यामुळे अखेर साराने सिनेमालाच राम राम ठोकला.
साराने अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही. मात्र, सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्यामुळे ती आधीपासूनच ग्लॅमर वर्ल्डसोबत जोडली गेलीय. जानेवारी 2012 मध्ये फॅशन मॅगझिन 'हॅलो'साठी साराने एक फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटमध्ये सारासोबत अमृता सिंहही दिसली होती.
अनेक निर्मात्यांनी साराला सिनेमे ऑफर केले होते. मात्र, अमृता सिंहनेच सर्व सिनेमांना नकार दिल्याची बॉलिवूडमध्ये चर्चा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement