एक्स्प्लोर

सैफच्या व्हॉट्सअॅप डीपीत तैमूर, करिना म्हणते 'नजर लागेल'

मुंबई : श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातली पुसटशी रेषा फिल्मस्टार आणि सेलिब्रेटींनाही ओळखायला कठीण जाते की काय, असं चित्र अनेकदा पाहायला मिळतं. आई कितीही उच्चशिक्षित असो, पोटच्या पोरांचा प्रश्न आला, की आई हळवेपणातून अंधश्रद्धेच्या आहारी गेलीच समजा. असंच काहीसं अभिनेत्री करिना कपूरच्या बाबतीत घडल्याचं दिसतं. नवाब अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी करिना कपूर यांच्या जगात तैमूरचं आगमन झाल्यानंतर तिघांचंही कोडकौतुक होत आहे. हौसेपोटी सैफने त्याच्या व्हॉट्सअॅपचा डीपी म्हणून स्वतःऐवजी तैमूरचा फोटो ठेवला. मात्र हा फोटो पाहून करिना काहीशी हिरमुसली. आधीच तैमूरचे फोटो व्हायरल होताना पाहून करिनाला कसंनुसं होतं. त्यातच नवऱ्याने बाळाचा फोटो ठेवल्यामुळे करिनाने तो तात्काळ हटवण्याचा हट्ट धरला. 'करिनाला मी तैमूरचा फोटो डीपी ठेवल्याचं आवडलं नाही. ती म्हणाली तैमूरला नजर लागेल' असं सैफने 'हिंदुस्तान टाइम्स'च्या 'एचटी कफे'ला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे. आपला नजर लागण्यावर विश्वास नसल्याचं सैफ म्हणतो. नजर लागायचीच असती, तर आतापर्यंत करिना हॉस्पिटलमध्ये गेली असती, असं सैफ म्हणाला. अर्थात अशा बोलण्यातून सैफच्या मनात बायकोचं असलेलं कौतुकच झळकतं. तैमूरच्या जन्मानंतर घरी नसलं, की मला चैन पडत नाही. सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत शूटिंग करत असताना मला घरची वारंवार आठवण येते, असं सैफ सांगतो. तैमूरचं नाव बदलण्याचा विचार शाळेत तैमूरचं नाव उगाच सगळ्यांच्या तोंडी बसावं, अशी माझी इच्छा नव्हती. म्हणून आपण तैमूरचं नाव बदलण्याची तयारीही केल्याचं सैफने काही महिन्यांपूर्वी बोलून दाखवलं होतं. मात्र करिना त्यासाठी राजी नव्हती, त्यामुळे ऐनवेळी विचार बदलल्याचं सैफने सांगितलं. करिनाने 20 डिसेंबर रोजी मुंबईच्या ब्रिच कँडी रुग्णालयात गोंडस मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर क्रूरकर्मा तिमूर राजाच्या नावावरुन बाळाचं नाव ठेवल्यामुळे सोशल मीडियात सैफ-करिनावर टीकेची झोड उठली होती. 'लोकांच्या मनात तुझ्याविषयी आदर आहे आणि तू तुझ्या मतांवर ठाम रहायला हवंस' असं करिनाने आपल्याला समजावल्याचंही सैफ सांगतो. मात्र लोकांसाठी नाही, तर त्याला शाळेत कोणी चिडवू नये, म्हणून मला त्याचं नाव बदलायचं होतं, असं सैफचं म्हणणं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
Deepika Padukone Ranveer Singh :
"दीपिका पादुकोणला आमची केमिस्ट्री आवडत नाही"; रणवीर सिंहने व्यक्त केली खंत
Salman Khan : सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
Prithviraj Chavan: भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 80 : आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines  : 8 AM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGhatkopar hoarding collapse :घाटकोपर पेट्रोल पंपावर महाकाय बॅनर कोसळला, मृतांचा आकडा 14 वर:ABP MajhaTOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 14 मे 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
Deepika Padukone Ranveer Singh :
"दीपिका पादुकोणला आमची केमिस्ट्री आवडत नाही"; रणवीर सिंहने व्यक्त केली खंत
Salman Khan : सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
Prithviraj Chavan: भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Heeramandi : 'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
Ghatkopar Hoarding Falls: अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
अरे झालंय काय,वागताय काय! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी ईशान्य मुंबईच्या 'भावी' खासदारांमध्ये जुंपली
अरे झालंय काय,वागताय काय! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी ईशान्य मुंबईच्या 'भावी' खासदारांमध्ये जुंपली
Weather Updates: पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
Embed widget