एक्स्प्लोर

Saif Ali Khan : सैफवर हल्ला करणारा 12 वी उत्तीर्ण, बांगलादेशला परत जाण्यासाठी 50 हजारांची गरज होती; पोलिसांच्या तपासातून मोठी माहिती समोर

Saif Ali Khan Attacker : सैफ अली खानच्या इमारतीच्या गेटवर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यानेच त्या ठिकाणी चोरी करण्याचा निर्णय हल्लेखोराने घेतला असल्याचं पोलिस तपासातून उघड झालं. 

मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. हल्लेखोर हा मूळचा बांगलादेशी असून 12 पर्यंत त्याचं शिक्षण झालं आहे. मुंबईत नोकरीच्या शोधात आलेल्या या हल्लेखोराला परत बांगलादेशात जायचं होतं. त्यासाठी त्याला 50 हजार रुपयांची गरज असल्याने त्याने सैफच्या घरी चोरीचा प्लॅन केल्याचं पोलिस तपासातून उघड झालं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले की तो 12 वी उत्तीर्ण आहे आणि चांगल्या नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता. आरोपी सध्या बेरोजगार असून त्याला बांगलादेशात परत जावे लागणार होते. त्यासाठी त्याला 50 हजार रुपयांची गरज होती. त्यामुळे त्याने चोरी करण्याचा निर्णय घेतला असल्याचं पोलिस तपासातून उघड झालं आहे.

गेटवर सिक्युरिटी नसल्याने चोरीचा प्लॅन

इमारतीच्या गेटवर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने आत प्रवेश करणे सोपं जाणार होतं. म्हणून हल्लेखोराने सैफ अली खानच्या घरी चोरी करण्याचा निर्णय घेतला. ही चोरी केल्यानंतर आरोपी गीतांजली एक्स्प्रेसने कोलकाता आणि तेथून बांगलादेशला पळून जाण्याची योजना आखत होता. मात्र प्लॅन अंमलात आणण्यापूर्वीच तो ठाण्यात पकडला गेला.

हल्लेखोर बांगलादेशी घुसखोर 

सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद शहजाद असं या आरोपीचं नाव असून तो बांगलादेशी घुसखोर आहे. मायदेशी पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. हल्लेखोर हा वरळी कोळीवाड्यात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. वरळीतील प्रजापती नावाच्या व्यक्तीच्या खोलीत तो राहत होता. तर वरळीतल्याच सिल्कवर्क या कॅफेमध्ये तो कामाला होता. 

वरळीतील कॅफेनंतर तो ठाण्यातील एका हॉटेलमध्ये कामाला लागला. पांडे नावाच्या व्यक्तीने त्याला कामाला लावलं होतं. सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत तो ठाण्यातल्या हॉटेलमध्ये कामाला होता. ठाण्यातील हॉटेलमध्ये काम करताना त्याने आपली खरी ओळख लपवून विजोय दास असं नाव सांगितलं होतं. आधारकार्डवरही तसंच नाव होतं अशी माहिती हॉटेलच्या मॅनेजरने दिली. 

सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर हा वांद्रेहून दादरला आणि त्यानंतर वरळी येथील सिल्कवर्क सिल्कवर्क  कॅफेच्या ठिकाणी आला होता. पोलिसांनी या कॅफेतील काही जणांना ताब्यात घेतलं आहे. तसेच त्यांचे मोबाईलही ताब्यात घेतले आहेत.

ऑनलाईन ट्रान्जेक्शन केल्याने पोलिसांनी माग काढला

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपीने ओळख लपवण्यासाठी वांद्रेमध्ये कपडे बदलले आणि दादर गाठलं. दादरहून वरळी कोळीवाड्यात तो गेला. वरळीतून  सेन्च्युरी बाजार परिसरातील भुर्जीपावच्या गाडीवर त्याने नाष्टा केला. यावेळी आरोपीने ऑनलाईन पेमेंट केलं. ज्या मोबाईलवरुन त्याने हे ट्रान्जेक्शन केलं त्याच मोबाईलचा माग काढत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget