एक्स्प्लोर

Sai Tamhankar : बॉलिवूडमध्ये सईचा जलवा! इम्रान हाश्मी आणि प्रतिक गांधीसोबत नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार

Sai Tamhankar Latest News : मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या बॉलिवूड आणि ओटीटीवर आपली छाप सोडत आहे.

Sai Tamhankar :  मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या बॉलिवूड आणि ओटीटीवर आपली छाप सोडत आहे. काही दिवसांपूर्वीच सई ताम्हणकरची भूमिका असलेला भक्षक चित्रपट  नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. त्यानंतर आता  'डब्बा कार्टेल' या वेब सीरिजमध्येही ती झळकणार आहे. आता सई ताम्हणकर इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) आणि प्रतिक गांधीसोबत (Pratik Gandhi) झळकणार आहे.अॅमेझॉन प्राईमवर सईचे हे दोन नवीन प्रोजेक्ट रिलीज होणार आहे. 

सई ताम्हणकर एक्सेल एंटरटेनमेंट सोबत दोन नव्या प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार असून 2024 मध्ये सईचा बॉलिवूडमध्ये डंका वाजणार आहे. इम्रान हाश्मी आणि प्रतीक गांधी यांच्यासोबत ती 'ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ मध्ये ती झळकणार आहे. इम्रान हाश्मी आणि प्रतीक गांधी सोबत सईची काय भूमिका असणार याची उत्सुकता लागली आहे. 

सई ताम्हणकर हिच्या 'ग्राउंड झिरो' आणि 'अग्नी' या दोन्ही आगामी प्रोजेक्ट च्या घोषणा ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या स्लेट मधून करण्यात आली आहे. सई या दोन्ही प्रोजेक्ट्सचा भाग  असणार आहे. या दोन्ही आगामी प्रोजेक्टबद्दल तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

इम्रान हाश्मी आणि प्रतीक गांधी सारख्या दोन दमदार कलाकारांचा सोबतीने सई दिसणार असून तिच्यासाठी हे प्रोजेक्ट महत्त्वाचे असणार आहेत. सई ताम्हणकरने आपल्या नव्या प्रोजेक्टबद्दल सांगितले की,“ एक्सेल एंटरटेनमेंट सारख्या प्रोडक्शन हाऊस सोबत काम करण्याची संधी मला मिळाली याचा खूप आनंद आहे. कायम वेगवेगळ्या प्रोजेक्टवर एक्सेल काम करते. त्यामुळेच त्यांच्या सोबतीने काम करण्याची वेगळी मज्जा आहे. आता मला त्यांच्यासोबत तिसऱ्यांदा काम करण्याची संधी मिळत असल्याचे सई ताम्हणकरने सांगितले.'डब्बा कार्टेल' सोबतीने " ग्राउंड झिरो " आणि " अग्नी " हे सगळेच प्रोजेक्ट्स माझ्या करिअरचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे तिने सांगितले. 

View this post on Instagram
 
A post shared by Sai (@saietamhankar)

इम्रान आणि प्रतीकचे कौतुक

तिच्या आगामी प्रोजेक्टमधल्या या सह-कलाकारांबद्दल सईने सांगितले की, " इम्रान हाश्मी आणि प्रतीक गांधी या दोघांची स्तुती करावी तेवढीच कमी आहे. दोघांच्या सोबतीने काम करण्याचा अनुभव खूप शिकवून जाणारा होता. इम्रान आणि प्रतीक हे अप्रतिम अभिनेते आहेत. आम्ही सोबत काम करतोय आणि  आता हे काम कधी एकदा प्रेक्षकांसमोर येणार यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत असेही सईने सांगितले. 

ओटीटीवर सईचा जलवा

'ग्राउंड झिरो' आणि 'अग्नी' या व्यतिरिक्त सई  'डब्बा कार्टेल' मध्ये सुद्धा दिसणार आहे. या  वर्षाच्या अखेर नेटफ्लिक्सवर 'डब्बा कार्टेल'ही वेब सीरिज रिलीज होणार आहे. एक्सेल एंटरटेनमेंटसोबत सईचा हा तिसरा प्रोजेक्ट असणार आहे. या  सीरिजमध्ये शबाना आझमी, ज्योतिका, शालिनी पांडे, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव आणि जिशु सेनगुप्ता यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Farmer Success Story : डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने चेहऱ्यावर हास्य फुलवले..शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाखांचं उत्पन्न घेतलं, आमदारांकडून कौतुकाची थाप
शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाख कमावले, आमदार अभिजीत पाटील यांच्यांकडून कौतुकाची थाप, म्हणाले..
Accident News : चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
Uddhav Thackeray : ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
Sanjay Raut : राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 24  डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  12 PM : 24  डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat visit Hostel : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून वसतीगृहाची पाहणीManu Bhakar : मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकूनही शिफारस नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Farmer Success Story : डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने चेहऱ्यावर हास्य फुलवले..शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाखांचं उत्पन्न घेतलं, आमदारांकडून कौतुकाची थाप
शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाख कमावले, आमदार अभिजीत पाटील यांच्यांकडून कौतुकाची थाप, म्हणाले..
Accident News : चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
Uddhav Thackeray : ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
Sanjay Raut : राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
Accident News : जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
Pune Crime: कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
Egg Price : सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Embed widget