एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तिकीट स्वस्त, 'सचिन : ए बिलियन ड्रीम्स' राज्यात टॅक्स फ्री
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित 'सचिन : ए बिलियन ड्रीम्स' हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
सचिनवरचा हा सिनेमा करमुक्त करणारं महाराष्ट्र चौथं राज्य ठरलं आहे. याआधी ओडिशा, केरळ आणि छत्तीसगड या तीन राज्यांनी 'सचिन : ए बिलियन ड्रीम्स' हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
सचिनचा सिनेमा पाहून कोहली भारावला, धोनीची प्रतिक्रिया काय?
'सचिन : ए बिलियन ड्रीम्स' अधिकाधिक लोकांनी पाहावा, तसंच पुढच्या पिढीने त्यातून प्रेरणा घ्यावी, असा आपला प्रयत्न होता. चित्रपट करमुक्त झाल्याने त्या प्रयत्नांना सहाय्य होणार असल्याचं निर्माते रवी भागचंडका यांनी सांगितलं.रिव्ह्यू : सचिन: अ बिलियन ड्रीम्स
'सचिन : ए बिलियन ड्रीम्स' आज देशभरात हिंदी आणि मराठीसह इतर भाषांमध्येही रिलीज झाला आहे. पहिल्याच दिवशी देशभरात या सिनेमाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी मुंबईत खास स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement