(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Romantic Movies : Padmaavat ते Devdas; ओटीटीवर तुमच्या पार्टनरसोबत 'हे' रोमँटिक चित्रपट नक्की पाहा
Romantic Movies : ओटीटीवर विविध विषयांवर भाष्य करणारे, वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यात रोमँटिक जॉनरच्या चित्रपटांची संख्याही जास्त आहे. 'पद्मावत' (Padmaavat), 'देवदास' (Devdas) या चित्रपटांसह अनेक रोमँटिक फिल्म्स प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येतील.
Romantic Movies : बॉलिवूडमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचे ऐतिहासिक चित्रपट बनवले जातात. यात ज्या व्यक्तिमत्त्वावर आधारित चित्रपट आहे त्याच्या आयुष्याच्या संघर्ष किंवा लव्हस्टोरीवर भाष्य करण्यात येते. रोमँटिक चित्रपट पाहणारा मोठा वर्ग असून त्यांना यापद्धतीचे सिनेमे पाहायला आवडतात. ओटीटीवर (OTT) विविध विषयांवर भाष्य करणारे, वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यात रोमँटिक जॉनर असणाऱ्या चित्रपटांची संख्या जास्त आहे. 'पद्मावत' (Padmaavat) ते 'देवदास'पर्यंत (Devdas) अनेक चित्रपटांचा यात समावेश आहे. तुम्ही हे चित्रपट घरबसल्या तुमच्या पार्टनरसोबत नक्की पाहा...
सम्राट पृथ्वीराज (Samrat Prithviraj)
कुठे पाहू शकता? प्राईम व्हिडीओ
'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट राजपूत राजा पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित आहे. पृथ्वीराज यांचं साहस आणि बलिदान हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. तसेच राजकुमारी संयोगिताची अनोखी प्रेम कहानी या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल.
लैला मजनू (Laila Majnu)
कुठे पाहू शकता? झी 5
'लैला मजनू' ही आजच्या काळात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी प्रेम कहाणी आहे. दोन लोक एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण कुटुंबियांच्या विरोधामुळे ते एकत्र राहु शकत नाहीत हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे. झी 5 वर प्रेक्षक हा रोमँटिक चित्रपट पाहू शकतात.
पद्मावत (Padmaavat)
कुठे पाहू शकता? प्राईम व्हिडीओ
'पद्मावत' हा ऐतिहासिक रोमँटिक चित्रपट आहे. राणी पद्मावतीचं आयुष्य या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. अलाउद्दीन खिलजीला रानी पद्मावतीची भूरळ पडते त्यानंतर काय होतं हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
गोलियों की रासलीला राम-लीला (Goliyon Ki Raasleela Ram-Leela)
कुठे पाहू शकता? जिओ सिनेमा
'गोलियों की रासलीला राम-लीला' या चित्रपटात दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) मुख्य भूमिकेत आहेत. दीपिका-रणबीर एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण दोघांचेही कुटुंबीय त्यांच्या नात्याला मान्यता देत नाहीत.
जोधा अकबर (Jodha Akbar)
कुठे पाहू शकता? नेटफ्लिक्स
जोधा अकबर बा चित्रपट जोधा नामक एर राजकुमारी आणि अकबर नामक एक मुस्लिम राजा यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आहे. राजकारणामुळे ते लग्नबंधनात अडकतात पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. 'जोधा अकबर' हा चित्रपट प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
देवदास (Devdas)
कुठे पाहू शकता? जिओ सिनेमा
'देवदास' चित्रपट शरत चंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित आहे. संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित या चित्रपटात मुख्य भूमिकेत होत्या.
संबंधित बातम्या