एक्स्प्लोर
रणवीर सिंग-करण जोहरवर अश्लील ट्वीट, ऋषी कपूर ट्रोल
यापूर्वीही अनेकवेळा आक्षेपार्ह ट्वीटवर टीका झाल्यामुळे ऋषी कपूर यांच्यावर ट्वीट्स डिलीट करण्याची वेळ आली होती. त्याप्रमाणे यावेळीही त्यांना ट्वीट मागे घ्यावं लागलं.
मुंबई : अभिनेते ऋषी कपूर कायमच त्यांच्या ट्वीटमुळे चर्चेत असतात. 'पद्मावत' चित्रपटावरुन रणवीर सिंग आणि करण जोहर यांची थट्टा करण्याच्या नादात ऋषी कपूर ट्रोल झाले आहेत. अखेर 'चिंटू' साहेबांनी ट्वीट डिलीट करणंच पसंत केलं, मात्र तोपर्यंत या ट्वीटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले.
“Ranveer Singh has announced that if Karni Sena tries to stop the release of Padmavat , he will do Johar .” असं ट्वीट करत ऋषी कपूर यांनी पोस्ट केलेल्या फोटोत रणवीर सिंग आणि करण जोहर एकमेकांना बाहुपाशात घेताना दिसत आहेत. 'जोहार' आणि 'जोहर' असा इंग्रजी भाषेतून शब्दच्छल करत ऋषी कपूर यांनी दोघांची थट्टा केली. (मराठीत भाषांतर करताना, त्याचा अर्थ कुठच्या कुठे विरुन जातो)
ऋषी कपूर या ट्वीटमुळे (पुन्हा एकदा) तोंडघशी पडले. यापूर्वीही अनेकवेळा आक्षेपार्ह ट्वीटवर टीका झाल्यामुळे त्यांच्यावर ट्वीट्स डिलीट करण्याची वेळ आली होती. त्याप्रमाणे ऋषी यांना यावेळीही ट्वीट मागे घ्यावं लागलं. एकीकडे चित्रपटावरुन वादंग निर्माण झालेला असताना सिनेसृष्टी 'पद्मावत' चित्रपटाच्या पाठीशी उभी आहे. मात्र कुठल्या कारणाने का असेना, खिल्ली उडवून ऋषी कपूर यांनी वाद ओढवून घेतला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement