Rhea Chakraborty NCB Arrest : रिया चक्रवर्तीची तुरुंगातील पहिली रात्र कशी होती?
सुशांत सिंग राजपूत ड्रग्स प्रकरणांमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. रिया चक्रवर्तीची तुरुंगात कशी होती पहिली रात्र.
मुंबई : सुशांत सिंग राजपूत ड्रग्स प्रकरणांमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. तिला 21 सप्टेंबरपर्यंत जेल कोठडी सुनावण्यात आली आहे. 9 सप्टेंबर रोजी रियाची भायखळा जेलमध्ये रवानगी करण्यात आली. रिया जेल मधील पहिली रात्र कशी होती?
सुशांत सिंग प्रकरणाच्या तपासात जेव्हा ड्रग्सचा अँगल समोर आला. त्यावेळेस नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तपास आपल्या हाती घेतला. या तपासादरम्यान रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. रियावर ड्रग्स घेणे, सुशांतला ट्रक्स देणे आणि ड्रग्स पेडलरच्या संपर्कात असल्याचे गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. 8 सप्टेंबरला रियाला जेल कोठडी सुनावण्यात आली. कशी होती रियाची जेल मधील पहिली रात्र.
कशी होती रियाची जेल मधील रात्र
आपल्या अटकेमुळे आणि कोर्टाने जामीन फेटाळल्यामुळे रिया चिंतेत होती. अडीच वाजेपर्यंत रिया जागीच होती, तिला झोप येत नव्हती. रिया खुप अस्वस्थ वाटत होती. 10×15 च्या बॅरेकमध्ये रियाला ठेवण्यात आलं आहे, रियाला रात्री 8 वाजताच जेवण मिळालं होतं. तेवढ्याच बॅरेकमध्ये रिया रात्री 11 वाजेपर्यंत फिरत होती. शेवटी थकून रिया रात्री खाली जमिनीवर बसली आणि एक टक खाली जमिनीकडेच पाहत होती. रियाच्या चेहऱ्यावर चिंता आणि तणाव स्पस्ट दिसत होतं. रात्री 12 च्या सुमारास रियाने अंथरूण टाकलं. जेलमध्ये रियाला 1 उशी, 1 चादर आणि 1 चटई देण्यात आली. रियाने अंथरूण टाकलं. मात्र, तिच्या डोळ्यातून झोप गायब होती.
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास तीन वेगवेगळ्या केंद्रीय एजन्सीकडून केला जात आहे. सीबीआयकडून सुशांतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली याचा तपास केला जात आहे, जर आत्महत्या केली तर का केली? ईडीकडून सुशांतच्या अकाउंटमधून पंधरा कोटी रुपयांची तफावटीचा तपास केला जात आहे. ड्रग्सचा प्रकार समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अमली पदार्थांचा संदर्भातील तपास केला जात आहे.
रियाच्या समर्थनार्थ बॉलिवूड कलाकार, अटकेच्या वेळी रियाच्या टी-शर्टवरील ओळी शेअर करत पाठिंबा
आर्थिक गैरव्यवहारांचा तपास करत असताना ईडीला रिया आणि शौविकच्या मोबाईलमध्ये ड्रग्स संदर्भातील चॅट सापडले. जे त्यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडं सोपवलं आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. दहा दिवसाच्या तपासामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या हाती महत्त्वाची माहिती लागताच त्यांनी धाडसत्र आणि अटक सत्र सुरू केले. लवकरच ड्रग्स कनेक्शन चक्रवर्ती कुटुंबीयांच्या घरापर्यंत पोहोचलं. रियाचा भाऊ शौविक, सुशांत हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि सुशांतचा नोकर दीपेश सावंत यांना अटक केल्यानंतर रिया आणि ड्रग्स कनेक्शन हळूहळू स्पष्ट होऊ लागलं आणि शेवटी रिया चक्रवर्तीलाही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अटक करण्यात आली.
चौकशीदरम्यान रियाने बॉलिवूडमधील बड्या लोकांची नावं घेतल्याची माहिती एनसीबी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. आता ही बडी नावं नेमकी कोण आहेत आणि त्यांचा या ड्रग्स प्रकरणात किती सहभाग आहे? याचं उत्तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी शोधत आहेत. या अशा परिस्थितीची रियाला सवय नाही, आणि बहुदा तिने कधी विचारही केला नसेल की अशी परिस्थिती कधी तरी तिच्यावर ओढावेल.
Rhea Chakraborty Arrested | रिया चक्रवर्ती दोषी आढळल्यास किती वर्ष शिक्षा होऊ शकते?