(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रियाच्या समर्थनार्थ बॉलिवूड कलाकार, अटकेच्या वेळी रियाच्या टी-शर्टवरील ओळी शेअर करत पाठिंबा
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी अनोख्या प्रकारे रिया चक्रवर्तीला पाठिंबा दिला आहे. अटकेच्या वेळी रियाने काळ्या रंगांचा टी-शर्ट परिधान केला, त्यावर काही ओळी लिहिल्या होत्या. याच ओळी सोशल मीडियावर शेअर करुन तिला न्याय मिळावा यासाठी आवाहन केलं आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात अंमली पदार्थ विरोधी विभागाने चौकशीच्या तिसऱ्या दिवशी अटक केली. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी अनोख्या प्रकाराने रिया चक्रवर्तीला पाठिंबा दिला. रिया चक्रवर्ती मंगळवारी (8 सप्टेंबर) काळ्या रंगांचा टी-शर्ट परिधान करुन एनसीबीच्या कार्यालयात पोहोचली होती. त्यावर लिहिलं होतं की, "गुलाब लाल असतात, वॉयलेट्स निळे असतात, चला मी आणि तुम्ही एकत्र मिळून पितृसत्ता उद्ध्वस्त करु." सेलिब्रिटी याच ओळी सोशल मीडियावर शेअर करुन रियाला न्याय मिळावा यासाठी आवाहन करत आहेत.
रिया चक्रवर्तीच्या टी-शर्टवरील हा मेसेज वेगाने व्हायरल झाला. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, पण सोबतच सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर हा मेसेज पोस्ट केला. शिवाय #justiceforrhea आणि #SmashPatriarchy हॅशटॅगही वापरले.
अनुराग कश्यप
विद्या बालन
सोनम कपूरView this post on Instagram
फरहान अख्तरView this post on Instagram
अमृता अरोराView this post on Instagram
टिस्का चोप्रा
दिया मिर्झा
View this post on Instagram
रियाला अटक आणि न्यायालयीन कोठडी रिया मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात पोहोचली. एनसीबीने चौकशीनंतर 3 वाजून 45 मिनिटांनी रियाला अधिकृतरित्या अटक केली. यानंतर तिच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. अटकेनंतर तिला सायन रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे तिची वैद्यकीय चाचणी तसंच कोरोना चाचणीही करण्यात आली.
या संपूर्ण प्रक्रियेला एक ते सव्वा तास लागला. वैद्यकीय अहवालात रियाची प्रकृती व्यवस्थित असल्याचं समोर आलं. तर कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली. यानंतर संध्याकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी तिला पुन्हा एनसीबीच्या कार्यालयात आणलं.
एनसीबीच्या कार्यालयात सवा आठ वाजता रियाला ऑनलाईन माध्यमातून कोर्टासमोर हजर केलं. एनसीबीने जामीन अर्जाला विरोध केला. हे स्वीकारुन कोर्टाने रियाचा जामीन अर्ज फेटळला आणि तिला 14 दिवसांची न्यायालयी कोठडी सुनावण्यात आली.
संबंधित बातम्या
Rhea Chakraborty Arrested: ड्रग्स कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक
Rhea Chakraborty Arrest | रिया चक्रवर्तीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, ड्रग्ज मागवत असल्याची कबुली