एक्स्प्लोर

परी हूं मैं : नन्ही कली.. नन्ही परी

पण, त्यासाठी करावे लागणारे कष्टही अमाप आहेत. त्याच्या शिफ्ट्स आणि त्यातून होणारी दमणूक छोट्या जीवाला मानवेलच असं नाही. त्यातून अनेक गोष्टी उद्भवतात. ही झाली मुलांची स्थिती. त्याबरोबरच, पालकांनाही या झगमगत्या दुनियेची भुरळ पडते. त्यातून मग अपेक्षांचं लादणं येतं. हीच गोष्ट घेऊन दिग्दर्शक रोहित शिलवंत आपल्यासमोर आले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून टीव्ही, सिनेमांसह सगळ्याच माध्यमांमध्ये लहान मुलांचा शिरकाव झाला आहे. लहान मुलांना मिळणारा टीआरपी, घराघरात तयार होणारे त्यांचे फॅन्स आणि रिअॅलिटी शोंमुळे मिळणारं ग्लॅमर या सगळय़ामुळे लहान मुलांना आणि त्याच्या पालकांना या क्षेत्राची ओढ वाटू लागली. पण त्याची दुसरी बाजूही होती. इथे काम करायचं तर पैसा, ग्लॅमर आहेच. पण, त्यासाठी करावे लागणारे कष्टही अमाप आहेत. त्याच्या शिफ्ट्स आणि त्यातून होणारी दमणूक छोट्या जीवाला मानवेलच असं नाही. त्यातून अनेक गोष्टी उद्भवतात. ही झाली मुलांची स्थिती. त्याबरोबरच, पालकांनाही या झगमगत्या दुनियेची भुरळ पडते. त्यातून मग अपेक्षांचं लादणं येतं. हीच गोष्ट घेऊन दिग्दर्शक रोहित शिलवंत आपल्यासमोर आले आहेत. 'परी हूं मैं' हा त्यांचा पहिला सिनेमा. या सिनेमातून खूप महत्वाची गोष्ट त्यांनी मांडू पाहिली आहे. दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच सिनेमा असल्यामुळे यातला नवखेपणा सगळीकडे दिसत राहतो. सिनेमाचा विषय महत्वाचा असला तरी त्याची गोष्ट मांडताना त्याची हाताळणी सोपी ठेवण्याकडे दिग्दर्शकाचा कल आहे. त्यामुळे सिनेमा घडत जरी योग्य पद्धतीने जात असला, तरी त्यात धक्का देणारे प्रसंग येत नाहीत. अपेक्षित वळणं घेत हा सिनेमा पुढे जातो. त्यामुळे त्यातलं नाविन्य टप्प्याप्याने कमी होत जातं. पटकथेबाबत पूर्वार्ध योग्य पद्धतीने हाताळण्यात आला आहे. पण उत्तरार्धात खरंतर जिथे पालक, मुलगी या दोघांच्या बाबतीत काही मानसिक द्वंद्व सुरू होतं. तिथे हा चित्रपट आणखी खोल जायला हवा होता असं वाटून जातं. विशेषत: या चित्रपटात समुपदेशकाचा प्रवेश झाल्यानंतर त्यातले संवाद, त्याचं चित्रण हे मनाला भिडणारं असायला हवं होतं असं वाटून जातं. खरंतर अर्थाअर्थी याचा एकमेकांशी संबंध नसला, तरी अशावेळी तारे जमीन पर हा सिनेमा आठवतो. त्यातही बाप शिक्षकाला भेटायला जातो. त्यात काही संवाद झाल्यानंतर सालोमन आयलंडचा उल्लेख आहे. अत्यंत कमी शब्दात पण अचूक वेध घेणारा तो प्रसंग त्या सिनेमात येतो. असो. तर अशा पद्धतीचं काहीतरी भरीव तिथे असायला हवं होतं असं वाटून जातं. त्यानंतर बापाच्या बदलेल्या मानसिकतेला अर्थ उरतो. तिथून या सिनेमावरची पकड हातून ढिली होऊ लागते. नंदू माधव, देविका दफ्तरदार या दोघांनीही समजून कामं केली आहेत. त्यांच्यामुळे सिनेमाचा स्तर वाढतो. त्यात भावनिक ओलावा येतो. तरीही उत्तरार्धात काही प्रसंग असायला हवे होते असं वाटून जातं. तर त्यात धक्कातंत्र आलं असतं. काहीतरी चकित करणारं भिडलं असतं. प्रेक्षकांचे आडाखे चुकून काहीतरी नवं त्यांना पाहता आलं असतं. सिनेमाच्या इतर तांत्रिक अंगांबद्दल सांगायचं तर छायांकन, संकलन, पार्श्वसंगीत नेटकं आहे. संगीताबाबात त्यातल वेगे वेगे धावू हे गाणं छान जमून आलं आहे. या बाबीमुळे हा सिनेमा नेटका असला, तरी आणखी काहीतरी हवं होतं असं वाटून जातं. त्यातल्या शेवटासाठीही आणखी थोडा वेळ घेतला असता तर बिघडलं नसतं असं वाटून जातं. या बाबींमुळे पिक्चरबिक्चरमध्ये या सिनेमाला मिळताहेत अडीच स्टार. या दिग्दर्शकाकडून आणखी चांगल्या चित्रपटाची अपेक्षा करायला हरकत नाही.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बिग बॉस फेम यूट्यूबरकडून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; वडिलांचा मोठा निर्णय, थेट वृत्तपत्रात छापलं!
बिग बॉस फेम यूट्यूबरकडून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; वडिलांचा मोठा निर्णय, थेट वृत्तपत्रात छापलं!
गोविंदा अन् सुनिताच्या घटस्फोटाच्या अफवांवर अखेर मुलीनं मौन सोडलं, म्हणाली ' गेली 2 वर्षे...'
गोविंदा अन् सुनिताच्या घटस्फोटाच्या अफवांवर अखेर मुलीनं मौन सोडलं, म्हणाली ' गेली 2 वर्षे...'
गौरव कपूर अडकणार 'या' अभिनेत्रीसोबत लग्नबंधनात; वेडिंग कार्डची चर्चा, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी...
गौरव कपूर अडकणार 'या' अभिनेत्रीसोबत लग्नबंधनात; वेडिंग कार्डची चर्चा, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी...
प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं इन्स्टाग्राम अकाउंट झालं बंद; नव्या अकाउंटमधून चाहत्यांना दिली माहिती, म्हणाला...
प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं इन्स्टाग्राम अकाउंट झालं बंद; नव्या अकाउंटमधून चाहत्यांना दिली माहिती, म्हणाला...

व्हिडीओ

Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arun Tupe Death: पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
Badlapur Uterine Eggs Selling Racket: नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
Pimpri-Chinchwad News: मोठी बातमी: युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
Mumbai Crime: फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
Sanjay Raut and PM Modi: पंतप्रधान मोदी महान वैज्ञानिक, नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मिठी नदीवर उभारावा, गॅस टंचाई दूर होईल: संजय राऊत
पंतप्रधान मोदी महान वैज्ञानिक, नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मिठी नदीवर उभारावा, गॅस टंचाई दूर होईल: संजय राऊत
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Embed widget