एक्स्प्लोर
विराट-अनुष्काच्या 'या' व्हायरल फोटोचं सत्य!

मुंबई : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं नातं अनेक चढ-उतारांना सामोरं गेलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या सेलिब्रेशन पार्टीला अनुष्काने हजेरी लावल्याची आणि त्यांच्यात पॅचअप झाल्याचीही चर्चा आहे. दोघांनी या रिलेशनशिपला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच विराट आणि अनुष्काचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. अनुष्का विराटला भेटण्यासाठी बंगळुरुला आली, तेव्हा हा फोटो क्लिक केल्याचं या फोटोमध्ये म्हटलं होतं. मात्र सत्य वेगळं आहे. खरंतर हा फोटा जुना असल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे.
विराट-अनुष्काचे पुन्हा एकत्र फोटो, पॅचअप झाल्याची चर्चा
हा फोटो काही वर्षांपूर्वी क्लिक केला आहे. शिवाय अनुष्का पंजाबमध्ये 'फिलौरी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. तर 'सुलतान'च्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी म्हणजेच मंगळवारी ती मुंबईत होती. त्यामुळे अनुष्का विराटला भेटण्यासाठी बंगळुरुला जाणं शक्य नाही. इतकंच नाही ट्रेलर लॉन्च सोहळ्यानंतर अनुष्का सिनेमाच्या चित्रीकरणासाठी पुन्हा पटियालाला रवाना झाली. याचा पुरावा म्हणजे अनुष्काची इन्स्टाग्राम पोस्ट. एक नजर टाका तिच्या पोस्टवर..आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























