एक्स्प्लोर

Rashmika Mandanna : ‘आशिकी 3’मध्ये कार्तिक आर्यनसोबत रोमान्स करणार रश्मिका मंदना! अभिनेत्रीच्या हाती आणखी एक बिग बजेट चित्रपट!

Rashmika Mandanna : या चित्रपटासाठी रश्मिका मंदनाचे नाव निश्चित करण्यात आले आहे. आता ‘आशिकी 3’ या चित्रपटात रश्मिका कार्तिक आर्यनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

Rashmika Mandanna : ‘आशिकी 3’ (Aashiqui 3) या बहुचर्चित चित्रपटात कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी झाली होती. तेव्हापासून या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीच्या निवडीबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अशी चर्चा होती की, दीपिका पदुकोण (Deepika Padukone), क्रिती सेनन (Kriti Sanon) किंवा श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यापैकी एक या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकू शकते. मात्र, त्यानंतर रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) देखील या असल्याची चर्चा सुरु झाली होती. आता रश्मिकाने या शर्यतीत बाजी मारल्याचे दिसते आहे.

या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीविषयी बरीच चर्चा रंगली होती. बॉलिवूडमधील अनेक चर्चित चेहऱ्यांची नावं आघाडीवर होती. मात्र, आता या चित्रपटात रश्मिका मंदना मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे समोर येत आहे. अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

रश्मिकाने मारली बाजी

या चित्रपटात कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकेल याची चर्चा चित्रपटाच्या घोषणेपासूनच सुरु झाली होती. याआधी या चित्रपटासाठी श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण आणि क्रिती सेनन यांची नावे चर्चेत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता या चित्रपटासाठी रश्मिका मंदनाचे नाव निश्चित करण्यात आले आहे. आता या चित्रपटात रश्मिका कार्तिक आर्यनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. याआधी अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर ‘आशिकी 2’मध्ये दिसले होते. या चित्रपटाला लोकांनी भरभरून प्रेम दिले होते. या चित्रपटातील गाणी बराच काळ लोकांच्या मनावर राज्य करत होती.

‘आशिकी’ची हिट फ्रँचायझी

1990 मध्ये प्रदर्शित झालेला ‘आशिकी’ हा चित्रपट महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात राहुल रॉय आणि अनु अग्रवाल मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटानंतर दोघेही रातोरात प्रसिद्ध झाले. यानंतर 2013 मध्ये मोहित सुरी दिग्दर्शित ‘आशिकी 2’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

सध्या कार्तिक आर्यन अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाचे शूटिंग करण्यात व्यस्त आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक समीर विद्वांस करत आहेत.

हेही वाचा :

Akanksha Mohan: मॉडेल, अभिनेत्री, डान्सर अन् इंजिनिअर, तरीही संपवावं वाटलं आयुष्य! जाणून घ्या कोण होती आकांशा मोहन

Vikram Vedha Review : ‘हृतिक म्हणजे अमिताभ बच्चन अन् अल्लू अर्जुनची कॉपी’, केआरकेने दिला ‘विक्रम वेधा’चा रिव्ह्यू!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra Net Worth: लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; 300 सिनेमे केलेल्या धर्मेंद्रनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य, नेटवर्थ किती?
लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; धर्मेंद्र यांंनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य
Jeetendra Shocking Video: जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
Ward Reservation: आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
Delhi Bomb Blast News: 'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nana Patole On Narendra Modi: '56 इंचाची छाती कुठे गेली?', Nana Patole यांचा Modi सरकारवर हल्लाबोल.
Delhi Blast: लालकिल्ला स्फोटात १२ ठार, Jaish-e-Mohammed चा हात असल्याचा पोलिसांना संशय.
Delhi Blast : अमित शहांची उच्चस्तरीय बैठक, तपासाचा घेतला आढावा
Delhi Terror Plot: स्फोटामागे Jaish-e-Mohammed? डॉक्टर Umar सह अनेक जण ताब्यात
Red Fort Blast: 'डॉक्टर उमर मोहम्मदच सुसाईड बॉम्बर', पोलीस सूत्रांची माहिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra Net Worth: लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; 300 सिनेमे केलेल्या धर्मेंद्रनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य, नेटवर्थ किती?
लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; धर्मेंद्र यांंनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य
Jeetendra Shocking Video: जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
Ward Reservation: आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
Delhi Bomb Blast News: 'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
Delhi Red Fort Blast: लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
Temperature Update: महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
Unmesh Patil: गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Dharmendra Daughter Esha Deol Post: 'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
Embed widget