Rashmika Mandanna : 'अॅनिमल' सुपरहिट होताच रश्मिका मंदाना पोहोचली काश्मीरला; नॅशनल क्रशने शेअर केला व्हिडीओ
Rashmika Mandanna : अभिनेत्री रश्मिका मंदानाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती काश्मीरमध्ये मजा-मस्ती करताना दिसत आहे.
Rashmika Mandanna Kashmir Video : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि बॉबी देओल (Bobby Deol) अभिनीत 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एकीकडे हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत असताना रश्मिका मंदाना काश्मीरला (Kashmir) पोहोचली आहे.
रश्मिका मंदानाचा काश्मिरमधील व्हिडीओ व्हायरल (Rashmika Mandanna Video Viral)
दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने अॅक्टिव्ह असते. अभिनेत्रीचा 'अॅनिमल' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दरम्यान तिने सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रश्मिका काश्मीरमध्ये (Kashmir) मजा-मस्ती करताना दिसत आहे.
View this post on Instagram
रश्मिकाने काश्मिरमध्ये मजा-मस्ती करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीचा क्यूट अंदाज पाहायला मिळत आहे. तिचा काश्मिरमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
रश्मिकाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव
रश्मिकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकीकडे तिचं कौतुक होत आहे. तर दुसरीकडे काहींनी मात्र तिला ट्रोल केलं आहे. रश्मिकाची पोज नेटकऱ्यांना न आवडल्याने त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे नॅशनल क्रश, क्यूटी, किती गोड, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
रश्मिका मंदानाबद्दल जाणून घ्या... (Who is Rashmika Mandanna)
रश्मिका मंदाना ही मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य सिनेमांसह बॉलिवूडदेखील तिने गाजवलं आहे. रश्मिका अनेकदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. तिच्या लग्नाबद्दल विविध अंदाज वर्तवले जात असतात. साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडासोबतही तिचं नाव अनेकदा जोडलं जातं. किरिक पार्टी, गीता गोविंदम या सिनेमांमुळे रश्मिकाला लोकप्रियता मिळाली आहे. रश्मिकाचा 'अॅनिमल' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. जगभरात या सिनेमाने 600 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. आता अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या