Badshah : रॅपर बादशाहने खरेदी केली ऑडी Q8, किंमत वाचून व्हाल थक्क
Badshah : रॅपर बादशाहने नुकतीच एक महागडी कार खरेदी केली आहे.

Badshah : तरुणाईंच्या लाडक्या रॅपर बादशाहने (Badshah) एक महागडी कार खरेदी केली आहे. बादशाहाने 'ऑडी Q8' (Audi Q8) ही कार खरेदी केली आहे. या कारची किंमत 1 कोटी 23 लाख रुपये आहे. बादशाहने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे.
बादशाहाच्या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव
बादशाहने कारसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अनेक सेलिब्रिटींसह चाहतेदेखील बादशाहच्या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. फोटो शेअर करत बादशाहाने लिहिले आहे, ऑडी Q8 या कारसोबत एक नवा प्रवास सुरू करण्यास मी उत्सुक आहे.
View this post on Instagram
बादशाहाकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन
रॅपर बादशाहकडे फक्त ऑडीच नव्हे तर अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. ऑडी कारचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लो यांनीदेखील त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून बादशाहाचा कारसोबतचा फोटो शेअर केला आहे. डायनेमिक, स्पोर्टी असा बादशाहाच्या नविन कारचा लूक आहे.
संबंधित बातम्या
Upcoming Movies And Series : मे महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; 'हे' वेब सीरिज आणि सिनेमे होणार प्रदर्शित
Chandramukhi : 'चंद्रमुखी' मधील नवं गाणं रिलीज; अजय गोगावलेच्या आवाजातील 'कान्हा' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Prithviraj Trailer : 'धर्म के लिए जी रहा हूँ , धर्म के लिए मरुंगा'; पृथ्वीराजचा जबरदस्त ट्रेलर रिलीज
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष





















