एक्स्प्लोर
संजू सिनेमावरील सलमानच्या कमेंटला रणबीर कपूरचं उत्तर
संजय दत्तचा बायोपिक ‘संजू’ या सिनेमाबाबत सलमान खानच्या प्रतिक्रियेवर रणबीर कपूरचीही प्रतिक्रिया आली आहे.

मुंबई: संजय दत्तचा बायोपिक ‘संजू’ या सिनेमात अभिनेता रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरवरुन रणबीर कपूरच्या अभिनयाचं सर्वजण कौतुक करत आहेत.
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला रणबीरच्या अभिनयाबद्दल विचारलं होतं, तेव्हा सिनेमाचा शेवटचा भाग स्वत: संजय दत्तने करायला हवा होता, असं सलमान म्हणाला होता.
सलमानच्या या प्रतिक्रियेवर रणबीर कपूरचीही प्रतिक्रिया आली आहे.
रणबीर कपूर म्हणाला, “आजपर्यंत कोणीही स्वत:च्या बायोपिकमध्ये स्वत:च भूमिका केलेली नाही. तसं झालं तर त्या पात्राचा परिणाम दिसत नाही. मला माहित आहे की माझी तुलना संजय दत्तसोबत होणारच. त्यामुळे मी खूप कष्ट केले असून, त्या पात्राला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला”
मनिषा नर्गिस दत्त, तर दिया मान्यता साकारणार; सलमानच्या भूमिकेत कोण?
लोक मला 40 वर्षाच्या संजय दत्तच्या रुपात पाहूदेत किंवा 20 वर्षाच्या, त्यांना वाटायला हवं की आपण एका कलाकाराला पाहतोय, जो संजय दत्तची भूमिका साकारतोय. मात्र हे ही सत्यच आहे की मी दुसरा संजय दत्त होऊ शकत नाही, असंही रणबीर कपूर म्हणाला.
सलमान काय म्हणाला होता?
“मी ट्रेलर पाहिला. जर सिनेमाच्या शेवटच्या भागात संजय दत्तने स्वत: भूमिका साकारली असती, तर उत्तम झालं असतं. ‘संजू’ सिनेमासाठी दुसऱ्या कोणी भूमिका का करावी? कारण शेवटच्या 8-10 वर्षाच्या भूमिकेला तुम्ही न्याय देऊ शकणार नाही”, असं सलमान खान म्हणाला होता.
हा सिनेमा 29 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या
'फादर्स डे'निमित्त 'संजू'ची 'जादू की झप्पी'
'संजू'तील टॉयलेट लीकेज दृष्याविरोधात सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार
VIDEO: संजू सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज
मनिषा नर्गिस दत्त, तर दिया मान्यता साकारणार; सलमानच्या भूमिकेत कोण?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
