एक्स्प्लोर

प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी रणबीर कपूरचा ‘राम अवतार’ होणार रिव्हील, ग्रँड इव्हेंट ठरणार ऐतिहासिक

दरम्यान , जेव्हा चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि रणबीर कपूरची एक छोटीशी झलक दाखवण्यात आली होती, तेव्हा अनेकांनी त्याच्यावर विश्वास व्यक्त केला. 

Ramayan Grand Event: रणबीर कपूरची रामायण ही 2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. आतापर्यंत चित्रपटातील कोणत्याही पात्राचा लूक समोर आलेला नव्हता. मात्र आता निर्माते प्रेक्षकांची प्रतीक्षा संपवणार असल्याचं दिसत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रामायणच्या टीमकडून मार्च महिन्यात एक भव्य इव्हेंट आयोजित करण्यात येणार आहे. हा चित्रपटाचा पहिला अधिकृत इव्हेंट असेल, ज्यामध्ये प्रमुख पात्रांचे फर्स्ट लूक रिव्हील केले जाणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) रामाची भूमिका साकारताना दिसणार आहे. सुरुवातीला रणबीर कपूरने साकारलेल्या रामाच्या भूमिकेवरून बराच वाद झाला होता. रणबीर कपूरने रामाची भूमिका करावी की नाही याबद्दल सोशल मीडियावर वाद सुरू झाला. दरम्यान , जेव्हा चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि रणबीर कपूरची एक छोटीशी झलक दाखवण्यात आली होती, तेव्हा अनेकांनी त्याच्यावर विश्वास व्यक्त केला. 

कुठे होणार हा ग्रँड इव्हेंट?

मीडिया रिपोर्टनुसार, हा इव्हेंट गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित केला जाणार आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्माता नमित मल्होत्रा यांनी यासाठी इनव्हिटेशन्स पाठवायला सुरुवात केल्याचंही सांगितलं जात आहे.स्टारकास्टपैकी नेमके कोण उपस्थित राहणार हे अद्याप निश्चित नसले तरी, रणबीर कपूर, साई पल्लवी, रवि दुबे आणि यश हे प्रमुख कलाकार असल्यामुळे त्यांच्या उपस्थितीची शक्यता वर्तवली जात आहे.


प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी रणबीर कपूरचा ‘राम अवतार’ होणार रिव्हील, ग्रँड इव्हेंट ठरणार ऐतिहासिक

या खास दिवशी होणार रामायणचा इव्हेंट

‘मिड-डे’च्या रिपोर्टनुसार, रामायणचा हा इव्हेंट राम नवमीच्या दिवशी, 27 मार्च रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित केला जाणार आहे. प्रोडक्शनशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने असंही सांगण्यात आलं आहे की, या इव्हेंटसाठी राज्य आणि केंद्र सरकारमधील अनेक वरिष्ठ नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे.

कधी रिलीज होणार चित्रपट?

रामायण पार्ट 1 हा चित्रपट यंदा दिवाळीला मोठ्या रिलीज म्हणून चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट वाल्मीकींच्या रामायणावर आधारित असून, प्रसिद्ध हिंदू महाकाव्याची कथा मोठ्या पडद्यावर मांडणार आहे.चित्रपटात यश रावणाची भूमिका साकारत आहेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. सनी देओल भगवान हनुमानाची भूमिका साकारणार असून, रवि दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
Sushant Singh Rajput: 'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
MHJ Fame Onkar Bhojane in Manjar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget