Sushant Singh Rajput: 'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
Sushant Singh Rajput sister: सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा दावा. पॉडकास्टमध्ये भावुक होत म्हणाली...

Sushant Singh Rajput sister Shweta: बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा मृत्यू होऊन 6 वर्षे उलटले. त्याचे चाहते अजूनही धक्क्यात आहेत. सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू नेमका कसा झाला? हे गुढ त्याच्या चाहत्यावर्गांमध्ये अजूनही कायम आहे. सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह (Shweta Singh Rajput) राजपूत आजही आपल्या भावाच्या आठवणीत रमलेली असते. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Entertainment) भावाचे फोटोस शेअर करत असते. जरी सुशांत सिंह राजपूत हयात नसला तरीही तिला आपल्या भावाची उपस्थिती जाणवते. अलिकडेच तिने पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. तसेच तिने यात बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.
सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा पॉडकास्टमध्ये मोठा दावा (Sushant Singh Rajput sister shwetas podcast)
श्वेताने मुलाखतीत सांगितलं की, स्वप्नात तिला सुशांत सिंह राजपूत दिसतो. भावाची उपस्थिती तिला जाणवते. आपल्या भावासोबत ती तासन्तास गप्पा मारत असते. सुशांतला तिने मिठीही मारली आहे. या गोष्टींचा खुलासा करताना श्वेता प्रचंड भावुक झाली. Supertalks By Themovingshipसोबत चर्चा करताना श्वेता आपल्या भावाबद्दल म्हणाली, 'हो, सुशांतच्या निधनानंतर मी त्याला मेडिटेशन आणि ड्रीम स्टेटमधून त्याला फिल करते. भावाच्या निधनानंतर मी त्याला फिल केलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी मी पाटण्याला गेले होतो. ज्या रुममध्ये मी थांबले होते, तिथे माझ्या भावाची अस्थी ठेवली होती'.
'रात्री माझा भाऊ माझ्याशी बोलायला आला होता. तासन्तास तो माझ्याशी बोलत होता. मला त्याने मिठी मारली. माझ्या मनात विविध प्रश्न निर्माण झाले होते. मी जे काही त्याला विचारलं, त्याने त्याची मला उत्तरं दिली. माझ्या गालावर त्याने किस करुन मिठी मारली. त्याचा श्वास मी अनुभवत होते', असं सुशांतची बहीण श्वेता म्हणाली. 'सुशांतच्या निधनाची बातमी जेव्हा मला मिळाली, तेव्हा मी कॅलिफोर्नियामध्ये होते. सुशांत आता आपल्यात नाही, हे ऐकताच माझं शरीर सुन्न पडलं'.
'मला रडू कोसळलं. भावाच्या मृतदेहाला अग्नी देण्यात आली. तेव्हा कोरोना काळ होता. त्यामुळे मी भारतात येऊ शकले नाही. माझ्या भावाला शेवटचा गुडबाय देखील बोलू शकले नाही. मी त्या रात्री खूप रडले होते', असं श्वेता सिंह राजपूत म्हणाली.
सुशांत सिंह राजपूतच्या कारकिर्दीतील महेंद्र सिंह धोनी यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक 'एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी' हा सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमामुळे सुशांत सिंह राजपूतला विशेष ओळख मिळाली. परंतु, अभिनेत्याच्या निधनानंतर एम.एस. धोनी यांनी सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाशी संपर्क साधला नाही, ही खंत श्वेताने पॉडकास्टमध्ये बोलून दाखवली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
14 ऑगस्टला OTTला रिलीज होणार दर्जेदार चित्रपट; हॉरर, कॉमेडी अन् रोमान्स, तुमचा विकेंडचा प्लॅन काय?






















