Ramayana : रणबीरच्या रामायणात 'सेक्रेड गेम्स'मधील कुक्कूची एन्ट्री! झळकणार शूर्पणखेच्या भूमिकेत
Ramayana : रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'रामायण' या सिनेमात 'सेक्रेड गेम्स'मधील कुक्कूची एन्ट्री झाली आहे.
Ramayana : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'रामायण' (Ramayana) हा आगामी सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमासंदर्भात प्रत्येक अपडेट जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अशातच आता रणबीरच्या 'रामायण' या सिनेमात 'सेक्रेड गेम्स'मधील कुक्कूची एन्ट्री झाली आहे.
'रामायण' या सिनेमात केजीएफ फेम यश, सनी देओल, बॉबी देओल, लारा दत्ता आणि साई पल्लवी यांचं नाव जोडलं गेलं आहे. आता या सिनेमात शूर्पणखाची भूमिका कोण साकारणार हे समोर आलं आहे. 'सेक्रेड गेम्स' या सीरिजच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री कुब्रा सैत (Kubbra Sait) या सिनेमात शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणार आहे.
कुब्रा सैत कोण आहे?
शूर्पणखेच्या भूमिकेसाठी कुब्रा सैतने ऑडिशन दिली आहे. तसेच ऑडिशन चांगली झाल्याने या भूमिकेसाठी निर्मात्यांनी तिची निवड झाल्याचं समोर आलं आहे. कुब्रा सैत छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांची सूत्रसंचालक असून मॉडल आहे. 'सुल्तान', 'रेडी' आणि 'सिटी ऑफ लाइफ' सारख्या सिनेमांचा ती भाग आहे. 'सेक्रेड गेम्स' या सीरिजमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या सीरिजमध्ये तिने कुक्कू ही भूमिमा साकारली होती. लवकरच ती देवा या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
View this post on Instagram
'रामायण' या सिनेमात रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर साई पल्लवी सीताच्या भूमिकेत दिसेल. सनी देओल हनुमानाच्या तर लारा दत्ता कैकेयीच्या भूमिकेत झळकणार आहे. रावणाच्या भूमिकेत दाक्षिणात्य सुपरस्टार यश दिसणार आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
बॉबी देओल रामायणाचा भाग नसणार
'रामायण' या सिनेमातील कुंभकरणच्या भूमिकेसाठी बॉबी देओलला विचारणा झाली होती. पण सध्या तो 'कुंगवा' या दाक्षिणात्य सिनेमाचं शूटिंग करत आहे. तसेच शाहरुख खानचा लाडका लेक आर्यनच्या 'स्टारडम' या सीरिजचाही तो भाग असणार आहे.
'रामायण' कधी रिलीज होणार? (Ramayana Release Date)
'रामायण' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात सनी देओल आणि यशची झलक पाहायला मिळणार आहे. जुलै 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
संबंधित बातम्या