एक्स्प्लोर

Raju Srivastava health Update : राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत आणखी सुधारणा, पत्नीशी बोलण्याचा केला प्रयत्न!

Raju Srivastava health Update : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या प्रकृतीत आता झपाट्याने सुधारणा होत असल्याचे बोलले जात आहे.

Raju Srivastava health Update : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या प्रकृतीत आता झपाट्याने सुधारणा होत असल्याचे बोलले जात आहे. राजू श्रीवास्तव यांना गेल्या बऱ्याच दिवसांपासून दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अजूनही एम्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आता त्यांच्या प्रकृतीबाबत नवी अपडेट समोर येत आहे. त्यांनी पत्नी शिखा यांच्याशी डोळ्यांनीच संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.

‘कोईमोई’च्या रिपोर्टनुसार, मीडियाशी संवाद साधताना कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांनी एक मोठी अपडेट दिली आहे. अजित यांनी सांगितले की, राजू श्रीवास्तव यांनी पत्नी शिखा श्रीवास्तव यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना अजित सक्सेना यांनी मीडियाला सांगितले की, राजू भैय्या यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्याचे हात पाय किंचित हालचाल करू लागले आहेत. एवढेच नाही, तर राजू यांनी डोळे उघडले आणि पत्नी शिखा श्रीवास्तव यांच्याकडे पाहिले. त्यांनी पत्नीच्या हाताला स्पर्श केला आणि आपण लवकर बरे होऊ, असे सांगण्याचा प्रयत्न केला.

तापामुळे पुन्हा व्हेंटिलेटरवर!

राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) हे जवळपास गेल्या महिनाभर दिल्लीच्या एम्समध्ये दाखल आहेत. दरम्यान, त्यांना केवळ एकदाच शुद्ध आली होती. परंतु, संसर्गामुळे पुन्हा त्यांची प्रकृती ढासळू लागली होती. त्यांना वारंवार ताप येत असल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे. 100 डिग्री ताप आल्याने राजू यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तव स्वतः 80-90 टक्क्यांपर्यंत नैसर्गिक ऑक्सिजन घेत आहेत.

देशभरातील चाहते करतायत प्रार्थना

जिममध्ये व्यायाम करत असताना राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खालावली होती. राजू श्रीवास्तव जिममध्ये कसरत करत होते, तिथे ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना छातीत दुखू लागले. त्यावेळी त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हापासून राजू श्रीवास्तव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान राजू यांची अँजिओग्राफी देखील करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांच्या हृदयात 100% ब्लॉकेज असल्याचे आढळले होते. राजू श्रीवास्तव लवकर बरे व्हावेत, यासाठी देशभरातील चाहते प्रार्थना करत आहेत.

संबंधित बातम्या

Raju Srivastav Health Update : सुनील पालने व्हिडीओ शेअर करत दिली राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची माहिती; म्हणाले...

Raju Srivastava Health Update : 'ते लढवय्ये आहेत, ही लढाई ते नक्कीच जिंकतील'; राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीनं दिली माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Embed widget