Patralekhaa Mangalsutra : पत्रलेखा - राजकुमारचा एअरपोर्ट लूक; पत्रलेखाच्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष
एअरपोर्टवरील पत्रलेखाचे आणि राजकुमारचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमधील पत्रलेखाच्या मंगळसूत्राने अनेकांचा लक्ष वेधले आहे.
Patralekhaa Mangalsutra : 15 नोव्हेंबर रोजी चंदीगढमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि अभिनेत्री पत्रलेखा (Patralekhaa) यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या या शाही विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 2010 पासून एकत्र असलेल्या राजकुमार आणि पत्रलेखा यांनी चंदीगढमधील ओबोरॉय सुखविलास रिसॉर्टमध्ये लग्नगाठ बांधली. लग्नसोहळ्यानंतर पत्रलेखा आणि राजकुमार मुंबईमध्ये आले. एअरपोर्टवरील या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमधील पत्रलेखाच्या मंगळसूत्राने अनेकांचा लक्ष वेधले आहे.
पत्रलेखाचं मंगळसूत्र
एका रिपोर्टनुसार, पत्रलेखाचे मंगळसूत्र हे डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केले आहे. 18K सोन्याने पत्रलेखाचं हे मंगळसूत्र तयार करण्यात आलं आहे. या मंगळसूत्रामध्ये ओनीक्स आणि मोती आहेत. पत्रलेखाच्या या मंगळसूत्राची किंमत 1,65,000 रूपये आहे.
लग्नसोहळ्यात लक्षवेधी ठरली होती पत्रलेखाची ओढणी
राजकुमारने सोशल मीडियावर लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केला आहे. पत्रलेखाच्या ओढणीच्या बॉर्डरवर एक खास संदेश लिहिला आहे. हा संदेश बंगाली भाषेत लिहिलेला आहे. या संदेशात लिहिले आहे, "माझं प्रेमाने भरलेलं हृदय आता तुला समर्पित करत आहे".
View this post on Instagram
पत्रलेखाने लग्नाचे फोटो शेअर करत लिहिली होते,"मी आज लग्न केले आहे. माझा प्रियकर, सखा, माझ्या कुटुंबातीलच एक सदस्य...मागील अकरा वर्षांतील माझ्या सगळ्यात जवळचा मित्र. तुझी पत्नी होण्याचे भाग्य मला लाभले आहे."