एक्स्प्लोर
सुपरस्टार रजनीकांतच्या मुलीचा कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज
![सुपरस्टार रजनीकांतच्या मुलीचा कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज Rajinikanths Daughter Soundarya Files Divorce Petition In Family Court सुपरस्टार रजनीकांतच्या मुलीचा कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/23160536/Rajinikanth-Saundarya.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांची धाकटी कन्या सौंदर्याने घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली आहे. बिझनेसमन पती अश्विन रामकुमारपासून काडीमोड घेण्यासाठी सौंदर्याने फॅमिली कोर्टात अर्ज केला आहे.
कोच्चडियन चित्रपटाचं दिग्दर्शन केलेली सौंदर्या ही फिल्ममेकर आणि ग्राफिक डिझाईनर आहे. सौंदर्या आणि अश्विन रामकुमार यांनी 2010 मध्ये एका भव्य सोहळ्यात लग्नगाठ बांधली होती. लग्नाला राजकारण, चित्रपट आणि बिजनेस क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. सौंदर्या-अश्विन यांना वेद हा दीड वर्षांचा मुलगा आहे.
मतभेद होत असल्यामुळे परस्पर संमतीने घटस्फोट घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दोघांमध्ये पटत नसल्याचं सप्टेंबर महिन्यातच समोर आलं होतं. त्यानंतर घटस्फोटाच्या विचारात असल्याचं सांगत तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याचा आदर राखण्याचं आवाहन केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
व्यापार-उद्योग
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)