Nashik Crime : अनंत कान्हेरे मैदानावर भरदिवसा 19 वर्षीय मुलीवर प्राणघातक हल्ला, नाशिकमध्ये खळबळ
Nashik Crime News : नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर एका 19 वर्षीय मुलीवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.

Nashik Crime : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अनंत कान्हेरे मैदानावर (Anant Kanhere Maidan) एका 19 वर्षीय मुलीवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. आज सकाळी दहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती मिळत असून हल्ला करणाऱ्या इसमाला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या (Mumbai Naka Police Station) हद्दीतील अनंत कान्हेरे मैदानावर आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास एका तरुणाने 19 वर्षीय मुलीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून प्रेम प्रकरणातून मुलीवर हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मुलीची प्रकृती चिंताजनक
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हल्ला करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. मुलीला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले असून मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सातपूरमध्ये एकावर कोयत्याने वार
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीत एकाने कारण नसताना एकावर कोयत्याने वार करून दुखापत केली. विलास बोरसे (22, रा. हिरावाडी, पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. रुपेश रवींद्र सूर्यवंशी (35, रा. विजयनगर कॉलनी, नवीन आडगाव नाका) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि.8) सकाळी आठच्या सुमारास जहागिरदार फुडस् या ठिकाणी असताना संशयित बोरसे याने काहीतरी कारणातून कोयत्याने छातीवर, डोक्यावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सातपूर पोलिसात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Nashik Crime : नाशिकमधील नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार अन् दगडफेक; परिसरात थरार, हल्लेखोर फरार























