एक्स्प्लोर

Bollywood News : दहशतवादी कारवायांमध्ये जुडलं अभिनेत्रीचं नाव, अचानक गायब झाल्यानंतर जमिनीत गाडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Entertainment News : ही बॉलिवूड अभिनेत्री अचानक गायब झाली आणि त्यानंतर तिच्यासह तिच्या कुटुंबियांचे मृतदेह गाडलेल्या अवस्थेत सापडले होते.

Entertainment News : बॉलिवूड सेलिब्रिटींचं वैयक्तिक आयुष्य त्यांच्या ग्लॅमरस आयुष्यापेक्षा पूर्णपणे वेगळं असतं. बॉलिवूड स्टार्सचं जीवन मोठ्या पडद्यावर फारच आकर्षक वाटतं, पण त्यामागचं वास्तव काही वेगळंच असतं. फिल्म इंडस्ट्री एक अशी हिरोईन होती, जिच्या हत्येनं सर्वांनाच धक्का बसला होता. सुट्टीवर गेलेली ही अभिनेत्री तिच्या संपूर्ण कुटुंबासह अचानक गायब झाली होची. त्यानंतर त्या अभिनेत्रीचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. इतकंच नाही तर, तिच्या कुटुंबातील सदस्यांनाही एकत्र पुरण्यात आलं.

अचानक गायब झाल्यानंतर जमिनीत गाडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

राजेश खन्ना यांच्यासोबत काम केलेल्या एका अभिनेत्रीचं नाव दहशतवादी कारवायांमध्ये जोडलं गेल्यानंतर ती अचानक गायब झाली, त्यानंतर तिच्यासह तिच्या कुटुंबियांचे मृतदेह जमिनीत गाडलेल्या अवस्थेत सापडले. ही अभिनेत्री म्हणजे लैला खान. अभिनेत्री लैला खान हिने सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत काम केलं. अभिनेत्री लैला खानचं मूळ ना रेश्मा पटेल. तिचा जन्म 1978 मध्ये झाला. वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. 

राजेश खन्ना यांच्यासोबत चित्रपटात काम

बॉलिवूड अभिनेत्री लैला खान 2008 मध्ये आलेल्या 'वफा: अ डेडली लव्ह स्टोरी' या चित्रपटात राजेश खन्ना यांच्यासोबत रुपेरी पडद्यावर दिसली होती. लैला खानचं नाव दहशतवादी कारवायांशी जोडलं गेलं. लैला खान हिचा विवाह प्रतिबंधित दहशतवादी गट हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी बांगलादेशचा सदस्य असलेल्या मुनीर खानशी झाला होता. 2011 मध्ये लैला खान आणि कुटुंबातील अनेक सदस्य अचानक बेपत्ता झाले होते आणि नंतर त्यांची हत्या झाल्याचं उघड झालं.

अचानक गायब झाल्यानंतर सापडला मृतदेह

अभिनेत्री लैला खानचं कुटुंब 30 जानेवारी 2011 रोजी   सासू, भावंडे आणि चुलत भावांसह, इगतपुरी येथे त्यांच्या सुट्टीच्या घरी जाण्यासाठी मुंबईचं घर सोडलं. 9 फेब्रुवारी 2011 रोजी लैला खानच्या आईने तिच्या बहिणीशी बोलताना, तिचा तिसरा नवरा, परवेझ इक्बाल टाक याच्यासोबत चंदीगडमध्ये असल्याचं सांगितलं होतं. यानंतर तिच्यासह संपूर्ण कुटुंब अचानक बेपत्ता झालं. यानंतर लैला खानच्या वडिलांनी त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. लैला खानसोबत काम करणारे बॉलिवूड दिग्दर्शक राकेश सावंत यांनीही ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.

कसा झाला प्रकरणाचा खुलासा?

17 जुलै 2012 रोजी लैला खानचे वडील नादिर शाह पटेल यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या मुलीच्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपवण्याची विनंती केली. गुन्हे शाखा योग्य प्रकारे तपास करत नसल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात लैला खानचे सावत्र वडील आणि दहशतवादी गटांचे संशयित सदस्य, परवेझ इक्बाल टाक आणि आसिफ शेख यांची नावे समोर आली होती, पण त्यांना गोवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी 21 जून 2012 रोजी इक्बाल टाकला आणखी एका प्रकरणात अटक केली होती.

जमिनीत गाडलेले मृतदेह सापडले

फेब्रुवारी 2011 मध्ये लैला खान आणि तिच्या कुटुंबातील अनेक सदस्यांची महाराष्ट्रात गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे इक्बाल टाक यांनी चौकशीत सुरुवातीला कबूल केले. मात्र, नंतर त्यांनी हे विधान मागे घेत आपण अजूनही जिवंत असल्याचा दावा केला. अखेरीस, इक्बाल टाकने मुंबई क्राईम ब्रँचला कबूल केलं की, त्याला खानची आई शेलिना यांना वैयक्तिक कारणास्तव मारायचे होते आणि त्याने लैला खान आणि तिच्या कुटुंबाची हत्या केली होती. इगतपुरीतील त्यांच्या बंगल्यामागे त्यांचे मतृदेह पुरण्यात आले होते. बंगळुरूमध्ये अटक करण्यात आलेल्या आसिफ शेखनेही टाकसह खुनात सहभाग असल्याची कबुली दिली. तपासादरम्यान, पोलिसांना खानच्या बंगल्याजवळ पुरलेले सहा मृतदेह सापडले, जे लैला खान आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांचे असल्याचे एनए चाचणीत समोर आले.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील क्यूट टप्पू आता विलनच्या भूमिकेत, भव्य गांधी नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Jitendra Awhad Full PC : प्रतिभा पवारांची गेटवर अडवणूक प्रकरण, जितेंद्र आव्हाड अजितदादांवर कडाडलेSantosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांतRajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Embed widget